वीजबिलाचं पाप भाजपचं, ऊर्जामंत्र्यांचं विधान बरोबर नाही - नाना पटोले

Nana Patole VS Nitin Raut
Nana Patole VS Nitin Rautsakal news
Updated on

मुंबई : राज्यात वीजेच्या मुद्द्यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत (Congress Minister Nitin Raut) यांनी राज्य सरकावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार पैसे देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थखात्याकडून पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महावितरणची कोंडी होते, असं नितीन राऊत म्हणाले. पण, वीजबिलाचं पाप हे भाजपनं (BJP) केलेलं पाप असून ऊर्जामंत्र्यांनी केलेलं विधान बरोबर नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) म्हणाले.

Nana Patole VS Nitin Raut
ऊर्जामंत्री नाराज, राज्य सरकार मदत करत नसल्याचा आरोप

वीजबालाचं पाप भाजपने केलं आहे. भाजपने जे पेरलं ते आता उगवत आहे. त्यामुळे शेतकरी भरडले जात आहेत. याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष दिले पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस म्हणून ऊर्जा खातं आमच्याकडे असलं तरी महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकत्र काम करायला पाहिजे, असं नितीन राऊत म्हणाले. यावरून महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचं दिसतंय. या तीन पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले ''महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही ठीक आहे. ऊर्जा मंत्र्यांनी केलेलं विधान बरोबर नाही. प्रत्येक मंत्री आपल्या खात्याची बाजू मांडतो.''

उत्तर प्रदेशात देखील शेतकऱ्यांना संपविण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण, ते महाराष्ट्रात होणार नाही. शेतकऱ्यांना भडकविण्याचं काम केलं जातंय. नितीन राऊतांना खात्याचा अंदाज आला असल्याने त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. उद्या राज्य अंधारात जाऊ नये, यासाठी त्यांनी ते भाकीत केलं असेल, असंही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.