महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले की, आज महाराष्ट्राला वाचवायचे आहे. महाराष्ट्र आज विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. महायुतीमध्ये विरोध अधिक आहे. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. जास्तीत जास्त जागा मिळवून सरकार स्थापन करेल, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र असले तरी ते आकडे खेळण्यात माहीर आहेत. या लोकांचा जनतेने लोकसभेत पराभव केला आहे. भ्रष्टाचारामुळे तिजोरी रिकामी आहे. भाजप खोटे बोलण्यात माहीर आहे. राहुल गांधी परदेशात काय बोलले ते समजून घ्यायला हे लोक तयार नाहीत. महागाई आणि शेतकरी यावर चर्चा करायला तयार नाही. राहुल गांधींच्या नाराजीच्या वृत्तावर नाना पटोले यांनीही वक्तव्य केलं आहे.
ही निवडणुकीची प्रक्रिया आहे. ज्याचे चुकीचे फॉर्म असतील त्याचे बाद होणार, हे कसे होतंय अद्याप माहिती नाही. महाविकास आघाडीत बंडखोरी राहणार नाही याचा आम्ही प्रयत्न करतोय. पुन्हा येईन असे म्हणून फडणविसांचे नुकसान झाले आहे. त्यामुळं आता पुन्हा म्हणताय तर त्यांचे नुकसान होईल. जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्यामुळे मविआचे सरकार येणार आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले पुढे म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची बदली आधी निवडणूक आयोगाने करावी. महासंचालकच सर्वांना सूचना करतात. त्यामुळे त्यांची बदली व्हावी मग सुधार होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.