लोकांनी ठरवलं तर महायुतीला सत्तेतून बाहेर काढतील म्हणत पटोलेंनी विधानसभेची तारीखच सांगितली! नेमकं काय म्हणाले?

Nana Patole News: नाना पटोले यांनी महायुती आणि सरकारवर टीका केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरही भाष्य केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
Nana Patole
Nana PatoleESakal
Updated on

नागपूर: शैक्षणिक व्यवस्था ही बिजनेस व्यवस्था झाली आहे. मोफतच्या नावावर मलाई खाणे सुरू आहे असून कमिशनखोरी सुरू आहे. यात भाजप एक्सपर्ट आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शालेय गणवेश वाटपाबद्दल बोलताना नाना पटोले असे म्हणाले आहेत. शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. शिक्षण व्यवस्था पडल्यास आली आहे. पीएचडी करुन काय दिवे लावनार आहे का? कशाला बोगसगिरी करावी, या सरकारचे फेलिव्हर झाले आहे. आरोग्य व्यवस्थेतही बोगसगिरी सुरू आहे, ससून याच उदाहरण असल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भाष्य केले आहे.

नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, हिंडनबर्ग, महाराष्ट्रातील राजकारण अशा अनेक विषयांवर भाष्य केले आहे. लाडकी बहीण योजनेवर बोलताना ते म्हणाले की, लाडक्या खुर्चीसाठी सरकारचा आटापिटा सुरू आहे. पोलीस भर्तीसाठी पावसात आमच्या बहिणी भिजत आहे. रस्त्याचा कडेला झोपत आहे. सरकारची ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना आहे, असं ते म्हणाले.

Nana Patole
Nashik Congress: जिल्ह्यातील 8 मतदारसंघावर काँग्रेसचा दावा! प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागविले जिल्हा काँग्रेसकडे अहवाल

महायुती आणि मुख्यमंत्र्यांवर बोलताना नाना पटोले म्हणाले, निवडणुका लावा कोणाला बुक्का पडेल हे माहीत पडेल. 27 नोव्हेंबर रोजी पुढील निवडणुका लावावी लागेल. महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केला तर महायुतीला सत्तेतून बाहेर काढतील. महाराष्ट्र गुजरातसमोर गहाण ठेवला हा प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री कोण आहे हे आम्ही निवडणूक नंतर ठरवू. कॉंग्रेस यावर आता बोलणार नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही.

सध्याचे सरकार हे खोक्याचे सरकार म्हणून जगात प्रसिद्ध आहे. हे असंविधानिक सरकार आहे. यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. सरकारमधील आमदार गरिबांचे घर देऊन लुटण्याचे काम करत असल्याचे म्हणत नाना पटोलेंनी जोरदार टीका केली आहे. नागपूरचा विकास जगात गाजत आहे. मात्र येथील लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. भ्रष्टाचार झाला हे लोकांना कळले आहे. आज डेंग्यू चिकनगुनिया या आजाराला सामोर जावे लागत आहे. यात दुवा होता तो दूर झाला. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. किड्यामकोड्या सारखे लोक ठेवले जात आहे, ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हिंडनबर्गवर बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, नागपुरात २२ मार्चला हिंडनबर्ग घोटाळासाठी मोर्चा काढू. सेबीच्या माध्यमातून घोटाळा समोर आला आहे. मध्यमवर्गीय बाजारात पैसे टाकतात, सामान्यांच्या पैशांची उधळपट्टी करत डाका टाकला जात आहे. हे भ्रष्ट सरकार आले आहे. 20 हजार कोटी बाहेरून आले ते कोणाचे याचे उत्तर सरकारने दिले नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.