Maharashtra Bhushan Award Ceremony : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महराष्ट्रभूषण पुरस्कार उद्या प्रदान करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते धर्माधिकारी यांचा सन्मान होईल. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे.
दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्राच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करतात. त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे नेला आहे. वडील नानासाहेब धर्माधिकारीही एक उत्तम प्रबोधनकार होते. १९४३ पासून त्यांनी कार्याची सुरुवात केली.
२००८ साली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला, खारघरमध्ये न भूतो न भविष्यति असा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी देश-विदेशांतून सुमारे ५० लाख लोकांची गर्दी झाली होती. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीला २०१० मध्ये 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये स्थान मिळालं. हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वीकारला होता. आज त्याच अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान होत आहे.
नवी मुंबईतल्या खारघर येथील सेंट्रल पार्कच्या मैदानावर 400 एकर परिसरात महाराष्ट्र भूषण पुरस्कार उद्या संपन्न होत आहे. समाज प्रबोधन, अध्यात्म, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला आहे. या सोहळ्याला 20 लाख श्री सदस्य अनुयायी आणि सर्वसामान्य लोक हजेरी लावतील, अशी शक्यता आहे.
नानासाहेब धर्माधिकारीही एक उत्तम प्रबोधनकार होते. १९४३ पासून त्यांनी कार्याची सुरुवात केली. आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब करतात. श्रवण बैठकांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं कार्य धर्माधिकारी कुटूंब करताहेत. १४ मे १९४६ रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म झाला आणि गेल्या ३० वर्षापासून निरुपण ते करत आहेत. चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने ते सन्मानित झाले.
कोणाला मिळतो पुरस्कार?
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार काही प्रमुख क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो. जसे की आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा विषेश पुरस्कार प्रदान केल्या जातो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.