Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Mumbai-Pune Expressway: पूर्वी पुण्यावरुन मुंबईला जाण्यासाठी पूर्वी ८ ते ९ तास लागायचे. आज केवळ दोन तास लागतात. बीओटी तत्त्वावर रस्ता बांधायला दिला नसता तर त्याला २५ वर्षे लागली असती. सरकारचा हस्तक्षेप कमी केल्यामुळे विकासाच्या कामांना गती मिळाली. येणाऱ्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पब्लिक, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणत आहोत, त्यामुळे अनेक मोठमोठे प्रकल्प शक्य होत आहेत.
Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान
Updated on

पुणेः 'सकाळ'चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 'पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील भारताचे भवितव्य' या विषयावर नितीन गडकरी यांनी मनोगत व्यक्त केलं. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, नानासाहेब परुळेकर यांनी पत्रकारितेमध्ये एक आदर्श निर्माण केला होता. तोच आदर्श आज पुढे नेण्याचं काम सकाळ समूह करत आहे. नानासाहेब परुळेकर जेव्हा संपादक होते, तेव्हाचं वृत्तपत्र आणि आजचं वृत्तपत्र यात फरक आहे. जे संविधान आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्यात लोकशाहीतल्या चार स्तंभांच्या भूमिका विषद केलेल्या आहेत. माध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. 'सकाळ'ने आपला वैचारिक वारसा जपल्याचं गडकरींनी नमूद केलं.

गडकरी पुढे म्हणाले, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा हे दोन्ही विषय माझ्या अतिशय जवळचे आहेत. मी या विषयातला तज्ज्ञ नाही. आणीबाणीच्या काळात मी जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेला समर्थन देत त्या लढ्यात ओढलो गेलो. त्यामुळे माझं अभ्यासात लक्ष नव्हतं. एचएससी परीक्षेमध्ये मला ५२ टक्के मिळालं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला जायचं होतं, पण ती संधी मिळाली नाही. परंतु आज मला नऊ डीलिट पदवी मिळालेल्या आहेत आणि ७ जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या खात्यात जमा झाले आहेत.

''मी जेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो तेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. मुंडे साहेबांनी मला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. बांधकाम खात्यामध्ये मला मोठमोठे प्रकल्प उभारता आले. त्यामुळे मी इन्फ्रास्ट्रक्चरकडे वळलो. विकासामध्ये चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी, रस्ते, ऊर्जा, संपर्क या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मागच्या ७५ वर्षांमध्ये लोकं गावं सोडून शहराकडे येऊ लागली. त्यामुळे शहरं वाढली आणि झोपडपट्ट्याही वाढल्या. शेतकऱ्यांना दुय्यम दर्जा मिळू लागला.''

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान
Pune Accident CCTV Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

सरकारने कंपन्या काढल्या पण...

स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मोठमोठ्या कंपन्या सरकारने काढल्या. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, विमान कंपनी यासह प्रत्येक क्षेत्रात सरकारचा हात होता. परंतु नंतर लक्षात आलं की ज्याचा राजा व्यापारी असतो त्याची जनता भिकारी असते. सरकारचा हात एवढा अशूभ आहे की जिथे हात लागला तिथे सत्यानाश झाला. त्यामुळे मुलभूत गरजा- रस्ते, वीज, पाणी आणि शेतीच्या प्रश्नांना प्राथमिकता मिळाली नाही.

पूर्वी पुण्यावरुन मुंबईला जाण्यासाठी पूर्वी ८ ते ९ तास लागायचे. आज केवळ दोन तास लागतात. बीओटी तत्त्वावर रस्ता बांधायला दिला नसता तर त्याला २५ वर्षे लागली असती. सरकारचा हस्तक्षेप कमी केल्यामुळे विकासाच्या कामांना गती मिळाली. येणाऱ्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पब्लिक, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणत आहोत, त्यामुळे अनेक मोठमोठे प्रकल्प शक्य होत आहेत.

गडकरी म्हणाले की, आता नवीन रस्ता बांधायला घेतला असून दिल्ली-मुंबई हायवे सुरतपर्यंत नेणार आहोत. त्याच हायवेला सुरतवरुन नाशिक, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद.. असा रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याचं ट्रॅफिक कमी होणार आहे. पुण्यात तीन-तीन लेअरचे पूल बांधण्याचा विचार आहे. तरीही ट्रॅफिक कमी होईल की नाही, हाच प्रश्न आहे, असंही गडकरी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.