Nanded Hospital Deaths: नांदेडमधील बालकांच्या मृत्यूला खासगी रुग्णालयेच जबाबदार; मुश्रीफांचा गंभीर आरोप

नांदेड दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर उद्या राज्य सरकारकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrifesakal
Updated on

नवी दिल्ली : नांदेडचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चोवीस तासांत झालेल्या नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी रुग्णालयांना जबाबदार धरलं आहे. (Nanded Hospital Deaths Private hospitals responsible for child deaths Hasan Mushrif serious allegation)

Hasan Mushrif
VBA in INDIA Alliance: वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत होणार सामिल? घडामोडींना वेग

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सुत्रांच्या माहितीनुसार, नांदेड मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील समोर आला आहे. या प्रकरणात चौकशी समिती लावली असून काही महत्वाचे कठोर निर्णय घेतले जातील, असं सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Hasan Mushrif
Sanjay Singh: मद्य घोटाळ्यात संजय सिंह यांनी कोट्यवधींची माया जमवल्याचे पुरावे?; ईडीचा दावा

हायकोर्टात उद्या उत्तर

सरकारी रुग्णालयातील स्वच्छता आणि डॅाक्टरांच्या बदल्यांबाबत सरकार पावलं उचलणार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. डॅाक्टरांच्या बदल्यांचं प्रकरण देखील सध्या चर्चेत आहे याबाबत देखील सरकार पावलं उचलणार आहे. नांदेड दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर उद्या राज्य सरकारकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे. (Marathi Tajya Batmya)

Hasan Mushrif
Sikkim Flash Floods: सिक्कीमच्या भीषण पुरात 8 जवानांसह 22 ठार, 3000 पर्यटक अडकले

खासगी रुग्णालयेच जबाबदार

नांदेड दुर्घटनेत नेमके मृत्यू कशामुळं झाले याबाबतची माहिती उत्तरात नमूद करण्यात आली आहे. 10 लहान मुलांचे मृत्यू झाले त्याला खाजगी दवाखाने जबाबदार असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. खाजगी दवाखान्यात 5 दिवस सुट्ट्या असल्यामुळं या खासगी रुग्णालयांनी अत्यवस्थ लहान मुलांना नातेवाईकांना सरकारी दवाखान्यात दाखल करायला सांगितल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.