नांदेड पोलिसांची झोप उडविणारा मेल; आरोपीला अटक, आज करणार कोर्टात हजर

तांत्रिक मदतीने हा मेल पाठविणाऱ्याची माहिती काढणाऱ्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर सोपविण्यात आली होती.
ardhapur photo
ardhapur photo
Updated on

नांदेड ः ‘‘१० कोटी रुपये द्या, नाहीतर नांदेडचे अनेक महत्त्वाची कार्यालये बॉम्बने उडवून टाकतो’’ (Bomb)अशी ईमेलद्वारे धमकी देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (Local Crime Branch Nanded) (ता. २३) ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Nanded -police -sleep-depriving mail- Accused- arrested- will appear- in- court- today)

‘‘मला १२ कोटी रुपये द्या, नाहीतर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयासह इतरही महत्त्वाची कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आठ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेलवर आला होता. हा मेल गोपनीय ठेवण्यात आला होता. पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी सदर आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

हेही वाचा - कार्यकर्तृत्वाच्या प्रसारात आणि प्रचारात आघाडीवर योगी सरकारला पंचायत निवडणुकांत मतदारांनी जमिनीवर आणले आहे. तरीही त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सरकारची निष्क्रियता उघड झाली.

तांत्रिक मदतीने हा मेल पाठविणाऱ्याची माहिती काढणाऱ्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. धमकीच्या मेलमध्ये दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर देण्यासाठी संदेश लिहिलेला होता. हॉटस्पॉटची क्षमता एक किलोमीटर लिहिलेली होती. १० कोटी रुपये आणि दरमहा पाच कोटी रुपये सुरक्षा कर येत राहील तोपर्यंत सर्वकाही गुप्त राहील असेही संदेशात आरोपीने म्हटलेले आहे.

पोलिस निरीक्षक श्री. चिखलीकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे, पोलिस अमलदार गंगाधर कदम, बजरंग बोडके यांनी यांनी याप्रकरणी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत संपर्क साधून या मेल पाठविणाऱ्याची माहिती मिळवली. त्यानुसार शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ (रा.आगापुरा, ता. अर्धापूर) याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()