गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून महिला आणि मुलींवरी अत्याचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत. यामुळे जनतेमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. बदलापूर, कोल्हापूरमधील घटना ताज्या असतानाच आता नंदुरबारमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे एका 40 वर्षीय व्यक्तीने जीवे मारण्याच्या धमक्या देत एप्रिल ते जुलै या काळावधीत आपल्याच 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले आहेत.
मुलीने आईक पोट दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले. तेव्हा तपसणी करता मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत समोर आले.
हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईने आपल्या पती विरोधात गुन्हा नोंदवला असून, शहादा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडित मुलगी कुटुंबियांसोबत शहादा तालुक्यातील प्रकाशात राहते. 40 वर्षांच्या असलेल्या आरोपी बापाने आपल्याच 13 वर्षांच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देत एप्रिल ते जुलै 2024 चा कालावधीत सतत अत्याचार केले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने पोटात दुखत असल्याचे तक्रार आईकडे केली. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत पीडिता गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक केली आहे.
दरम्यान बदलापूर येथील शाळेतील प्रकरण ताजे असताना नंदुरबारमधील एका शाळेतील एका ५० वर्षीय सफाई कामगाराने पाचवीच्या वर्गातील मुलीचा अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. ही घटना 27 ऑगस्टची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर मुलीने घरी जाऊन संपूर्ण हकीकत तिच्या पालकांना सांगितली. यानंतर मुलीच्या पालकांनी शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली आणि याप्रकरणी संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.