Narayan Rane: ...अशी उधळली राणेंची सभा, २००५ मधील प्रकरणात ३८ आरोपींवर दोषारोप निश्चित! तेव्हा नेमकं घडलं होतं?

Narayan Rane
Narayan Rane
Updated on

Narayan Rane: नारायण राणे यांची २००५ मध्ये सभा उधळल्याप्रकरणी ३८ आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये  ३ विद्यमान खासदार आणि ४ आमदार आहेत. तब्बल १८ वर्षानंतर आरोपींवर दोषारोप निश्चित झाले आहेत. खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार रविंद्र वायकर, किरण पावस्कर हे कोर्टात हजर झाले आहेत. त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहे.  १८ वर्षापूर्वी नारायण राणे यांची सभा उधळून लावण्यात आली होती. पोलिसांनी १८ वर्षानंतर दोषारोप निश्चित केले. न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दोन्ही बाजू ऐकून न्यायाधीश निर्णय घेणार आहोत.

दरम्यान हे प्रकरण काय आह? २००५ मध्ये नेमकं काय घडलं होतं? हे समजून घेऊया. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नारायण राणे यांनी नुकतीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यानंतर राणे काँग्रेसच्या वाटेवर होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राणे यांची प्रभादेवी येथील सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कार्यालयाजवळ राणे समर्थकांनी सभा आयोजित केली होती. 

यावेळी शिवसेनेने सभेला जोरदार विरोध केला. प्रतिस्पर्धी गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी लाठीमार करण्यात आला. यातील अनेकांना जबर जखमा झाल्या होत्या, तर तिघांचे हात तुटले होते.

नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते. शिवसेना आणि राणे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. सभेच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत आमदार सदा सरवणकर, बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा गट नवीन प्रभादेवी मार्गावरील दत्तू बांदेकर चौकात घटनास्थळाजवळ जमा झाला होता.

शिवसैनिक पक्षाचे भगवे झेंडे घेऊन राणेंच्या विरोधात घोषणा देत होते. दंगल नियंत्रण पोलिसांसह शेकडो पोलीस कर्मचार्‍यांनी परिस्थितीचा आढावा घेत कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड केले होते.  सामना कार्यालयाजवळ रॅली काढून राणे  चिथावणी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप शिवसेनेने केला होता. नारायण राणे यांच्या सभेला दिलेली परवानगी मागे घेण्यास शिवसैनिकांनी सांगितले होते. मात्र पोलिसांनी परवानगी रद्द करण्यास उशीर झाल्याचे सांगितले आणि आंदोलकांना घटनास्थळ सोडण्यास सांगितले. शिवसैनिकांनी नकार दिल्याने उपायुक्तांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते.

Narayan Rane
COP28 : आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल समिट भारतात होणार; PM मोदींची दुबईत घोषणा

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक महिला देखील जखमी झाल्या होत्या. स्थानिक आमदार सरवणकर आणि माझगावचे आमदार नांदगावकर पोलीस व्हॅनमध्ये ढकलण्यात आले होते. शेकडो सैनिकांना कार्यक्रमस्थळापासून दूर नेण्यात आले. परिसरातील स्थानिक दुकानदारांनी हिंसाचाराच्या भीतीने शटर खाली केले तर बाल्कनीतून लाठीचार्ज पाहणाऱ्या स्थानिकांना पोलिसांनी घरातच राहण्यास सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा ‘ठेका’ घेतला असल्याचा आरोप केला.सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी दादर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून घेराव घातला. त्यावेळी शिवसैनिक आक्रमक झाला होता. वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमधील फर्निचरची मोडतोड केली. त्यांनी काही पोलिसांची दमदाटीही केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यातच लाठीमार केला.

माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी पोलीस ठाण्यात दाखल होणार असतानाच शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी मध्यस्थी केली. यावेळी पोलीस जोशींच्या देखील अंगावर गेले होते. त्यावेळी "जोशींना मारू नका, ते माजी मुख्यमंत्री आहेत. जरा आदर दाखवा," अशी विनंती रावले यांनी केली. त्यानंतर संतप्त पोलिसांनी रावले यांच्यावर राग काढला आणि त्यांच्या डाव्या पायावर लाठी मारली.

दादर पोलिसांनी रविवारी उशिरा ३५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याच प्रकरणात पोलिसांनी आता १८ वर्षानंतर दोषारोप निश्चित केले आहेत. 

Narayan Rane
IPL Media Rights : 'आयपीएल प्रसारण हक्क ५० अब्ज डॉलरची झेप...' अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी केला मोठा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.