राज्यातील महाविकास आघाडी आणि शिवसेनेमधील (Shiv Sena) संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतो. दोन्ही पक्षातील नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. यातच नारायण राणे यांनी मातोश्रीवरील चौघांची ईडी चौकशी होईल असा खळबळजनक दावा केला होता. याशिवाय बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणांची फाईल पुन्हा उघडणार असा दावा नारायण राणेंनी (Narayan Rane) केला होता. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे पत्रकार परिषद घेत आहेत. "खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग (Sushant Singh Rajput) व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले." असं ट्विट नारायण राणेंनी केलं होतं. (Narayan Rane Press Conference Live Updates)
नितेश एक कलाकार आहे याचा अभिमान आहे. त्याने मांजराचा आवाज काढला. नारायण राणेंनी केलं नितेश राणेंचं कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाबद्दल बोलताना राणे म्हणाले की, दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता, दिला असता राजीनामा, आता उभा रहायला दोन दोन वर्षे लागतात, महाराष्ट्रात अशी वेळ कुणावर आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा धंदाच केला. शिवरायांचं नाव घ्यायचं असेल तर जनतेला अन्न वस्त्र निवारा देण्यासाठी कायतरी करा. मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेट बैठकीला, सभागृहात जात नाही मुख्यमंत्री, असाही मुख्यमंत्री झाला याची इतिहासात नोंद होईल. गुणवत्ता पात्रता नसतानाही सव्वादोन वर्षे काढली ही बाळासाहेबांची पुण्याई...साहेब असे नव्हते. - राणे
आम्ही अजून काही काढलं नाही? कसली दुष्मनी घेता, घ्या ना? मी शरण येणारा नाही. मी मराठा आहे. आम्हाला राजकारण कुणी शिकवू नये. आम्ही कुनाच्या पोटावर मारले नाही. - राणे
दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट का नाही आला ? सीसी टीव्हीचे कॅमेरे कसे गायब झाले, ठराविक व्यक्तीची रुग्णवाहिका कशी आली, हॉस्पिटलला कुणी नेलं, सगळे पुरावे कुणी नष्ट केले, त्यात अधिकारी कोण होते हेसुद्धा माहिती आहे. सुशांतसिह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. - राणे
दिशा सालीयनची बलात्कार करून हत्या करण्यात आली. तिथे कोण कोण होतो. सालीयनचा पोस्ट मोर्टम रिपोर्ट का नाही. मस्टरची पाने कुणी फाडली. सुशांत सिंग याला कळलं तेव्हा तो म्हणाला मी यांना सोडणार नाही. त्यावेळी काही लोक त्याच्या घरी गेले. तिथे बाचाबाची झाली आणि त्याची हत्या करण्यात आली. रमेश मोरेची हत्या कुणी केली? का केली? त्याची कुणाशी दुष्मनी नव्हती तरी का हत्या झाली. राणे
पालिका त्यांच्या हातात आहे. सातत्याने तक्रार करायच्या. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. मात्र आता शिवसेनेचे प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर उठले. मातोश्री 2 आणि 1 दोन्हीचे प्लॅन माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर येत नाही. हा कोण तरी प्रदीप भालेकर आहेत. हा प्रदीप भालेकर म्हणतो वैभव नाईक, विनायक राऊत यांनी भाग पाडले आणि नंतर मी तुरुंगात गेलो तेव्हा कुणी आलं नाही असे त्याचे ट्विट आहे. हेच आमचे सीधुदुर्ग जिल्ह्याचे नेते. मी साहेबांना सांगितले घर बांधतो तेव्हा साहेबांनी माझे अभिनंदन केले. - राणे
नारायण राणें यांच्या जुहूमधील इमारतीच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई मनपाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर नारायण राणेंनी आज प्रतिक्रीया दिली.- राणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.