'सेनेची सत्ता गेल्यात जमा त्यामुळं युवराजांनी धमक्या देणं बंद करावं'

गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल?
latest political News
latest political News
Updated on
Summary

गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल?

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. रोज घडणाऱ्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, ठाकरे सरकारमधील सेना नेते गुवाहाटीत असून या सर्व नेत्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट दणका दिला आहे. ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांची खाती काढून घेतली असून मंत्रीमंडळाचं फेरवाटप केलं आहे. या खात्यांचा तात्पुरता कार्यभार नव्या मंत्र्यांवर सोपवला आहे. दरम्यान, या वादात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. (latest political News)

latest political News
बंडखोरांसाठी मिटकरींचे ट्वीट; "एकादशी" तिकडे अन्...

या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा आहे. त्यामुळे युवराजांनी धमक्या देणं बंद करायला हवं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?, असा सवाल राणे यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

latest political News
Maharashtra Politics : बंड आमदारांचा गुवाहाटीतील मुक्काम वाढणार; सूत्रांची माहिती

दरम्यान, संजय राऊत यांना ईडीचे समन्स बजावले आहे. यावर बोलताना महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हे राजकारण नाही, ही आता सर्कस झाली आहे. जे इथून पळून गेले आणि स्वतःला बंडखोर म्हणवून घेत आहेत. त्यांना बंड करायचे असेल तर त्यांनी इथे करायला हवे होते. राजीनामा देऊन निवडणूक लढवायला हवी होती. दुसऱ्या फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा डोळ्यात बघतील आणि सांगतील त्यावेळी त्यांना त्यांची चूक कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.