पुढच्या तासात राज्यातील राजकारण बदलणार, 56 पैकी 35 आमदार फुटले - राणे

एकनाथ शिंदेना सेनेत वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांनी हे बंडखोरीचे पाऊल उचलले आहे.
Narayan Rane
Narayan Rane Narayan Rane
Updated on
Summary

एकनाथ शिंदेना सेनेत वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांनी हे बंडखोरीचे पाऊल उचलले आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदेना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आज एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे लागले आहे. शिंदे यांना वारंवार शिवसेनेत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांनी हे बंड केलं आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. आजच्या राजकीय घडामोडींवर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 56 पैकी 35 आमदार फुटले असल्याने पुढच्या तासात राज्यातील राजकारण बदलणार आहे, असा सूचक विधानही त्यांनी दिला आहे.

यावेळी राणे म्हणाले, एकनाथ शिंदेंना शिवसेनेत वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यामुळे त्यांनी हे बंडखोरीचे पाऊल उचलले आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंनी घेतेलाल निर्णय योग्य असून आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र तसं घडलेलं नाही. शिवसेनेत जे आनंद दिघेंसोबत घडलं तेच एकनाथ शिंदेसोबतही घडलं असतं. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं अभिनंदन करतो असंही राणे म्हणाले आहेत. शिवसेनेचे 56 मधील 35 आमदार फुटले असूनही मुख्यमंत्री राजीनामा का देत नाहीत असा सवालही त्यांनी नारायण राणेंनी केला आहे.

Narayan Rane
'त्या' पाच नॉटरिचेबल आमदारांबद्दल काँग्रेसचे स्पष्टीकरण

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी सरकार राहिलेलं नाही. राज्यातील राजकारणाचं चित्र येत्या तासांत स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर फक्त ५० कार्यकर्ते आले आहेत. सुरतमधील बैठक संपल्यानंतर नार्वेकर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळं आता खासदार संजय राऊतांचा आवाज बसला असून उद्या तो बंद होईल, असंही टोलाही त्यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळंल आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, बैठकीनंतर सेना आमदार खासदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. शिंदेची भूमिका हिंदुत्वाची आहे. त्यांना शिवसेनंन वारंवार डावललं आहे. कारण सेनेला वरचढ झालेलं चालत नाही. कुणी वरचढ झाले तर त्यांचे पाय छाटले जातात, हे त्यांच सुत्र असून तेच एकनाथ शिंदेच्या बाबतीत झाले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Narayan Rane
सरकार स्थापनेवेळी शिवसेनेने विमान पाठवलेले आमदारही फुटले, सगळेच सूरतमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.