गोमूत्र शिंपडण्यापेक्षा तरुणांना रोजगार द्या; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

narayan rane
narayan ranesakal media
Updated on

नालासोपारा : राज्यात 3 लाख कामगार बेकार (workers unemployement) आहेत, साडे तीनशेच्या वर छोटेमोठे उधोग (small business) धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे गोमूत्र शिंपडण्यापेक्षा राज्यातील तरुणांना नोकरी (youngster employment) द्यावी, रोजगार उपलब्ध करून द्यावा, असा घणाघात केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर केला आहे.

narayan rane
राज्यात २२ ऑगस्टपासून पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री झाल्या नंतर 19 ऑगस्ट पासून नारायण राणे यांनी मुंबईतून जनसंवाद आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. आज शनिवारी राणे यांची जनसंवाद आशीर्वाद यात्रा वसई विरार नालासोपारा भागात काढण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई चिंचोटी येथे त्यांचे ढोल ताशाचा गजर, आदिवासी तारपा नृत्य, आणि चाफा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला हार घालून वसईतील जनसंवाद यात्रेला त्यांची सुरवात करण्यात आली. वसई फाटा, वालीव, येथे कार्यकर्त्यांशी सवांद साधून, नालासोपारा येथील रेजनशी सभागृहात त्यांनी वसईतील उधोजकांशी सवांद साधला आहे. यावेळी वसईतील उधोजकाना नवी संजीवनी देण्यात येईल असे आश्वासन ही उधोजकाना देऊन, पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नारायण राणे यांनी प्रखर टीका केली आहे.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या 7 वर्षात देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनत्यासाठी 25 विविध योजना आणल्या आहेत. त्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मी जनसंवाद यात्रा काढली आहे. देशाचे उत्पन्न वाढावे, देशातील गरिबी जावी ही भूमिका पंतप्रधान ची आहे. देशाची सुरक्षा आणि आरोग्य व्हावस्थे वर तात्काळ निर्णय घेणार एकमेव पंतप्रधान मोदी आहेत. मला केंद्रात मंत्री करून, देशातील सूक्ष्म आणि लघु उधोग खाते मला दिले आहे. देशात उदोजक बनावे आणि रोजगार मिळावा,देशाचा विकास दर वाढवून देशाला महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान काम करत आहेत असे राणे म्हणाले आहेत.

narayan rane
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझेसह सहा जणांवर गुन्हा दाखल

मनसे आणि भाजप यांच्यात युती झाली तर मला आनंदच होणार आहे. जिथं आघाडी होते तिथे बिघाडी होते असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडीवर राणे यांनी टोला मारत आम्ही मनात आणले तर महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार कधीही विसर्जित करू शकतो असा विश्वास ही दर्शविला आहे. केंद्रातून राज्याला कोरोनाची लोकसंख्येप्रमानात लस मिळत नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारकडे यासाठी स्वतंत्र बजेट आहे, ते बजेट इथल्या जनतेच्या लस साठी वापरावे, पण त्याच्यात 12 टक्के टक्केवारी घेऊ नये असा आरोप शिवसेनेवर केला आहे. तसेच त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेवर टीका करताना राणे म्हणाले की, शिंदे हे फक्त सही पुरते मंत्री आहेत, त्यांच्या सर्व फाईल चे अधिकार मातोश्रीवरून निघतात, ते स्वता अशवस्थ आहेत, आणि शिवसेनेला कंटाळले आहेत..

मी पिंजऱ्यात बसून काम करत नाही, मी नेहमी जनतेत आहे. त्यामुळे माझ्यासाठी लोक जमा होतात. आम्ही दुसऱ्या सारखे किरायाने गाड्या भरून माणस आणत नाहीत. पिंजऱ्यात बसून राहणाऱ्यानी आम्हाला शहाणपणा शिकवू नये असा उपरोधात्मक टोला ही शिवसेनेला राणे यांनी लगावला आहे. नारायण राणे यांच्या जनसंवाद आशीर्वाद यात्रा ही आज दिवसभर पावसातच सुरू होती. या यात्रेत त्यांच्यासोबत भाजपा आ संजय केळकर, आ प्रसाद लाड, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.