सिंधुदुर्ग : सध्या लक्ष महाराष्ट्रावर आहे. सत्ता आमची नाही. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. महाराष्ट्राला आज मुख्यमंत्री (Maharashtra CM Uddhav Thackeray) नाही. विकसित राज्य अधोगतीकडे चालले आहे. अशा अवस्थेत ते राहू नये यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे. 'लगान'ची टीम नको, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
केंद्रात नरेंद्र मोदी जनतेच्या समृद्धीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी कोरोना काळात जनतेसाठी काम केले. अनेक योजना आणल्या आहेत. भाजपच्या राज्यकर्त्याची जगात प्रशंसा होत आहे. याच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला राज्यात हवा आहे, असं नारायण राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्थमंत्री आले आणि तिन्ही पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करून गेले. याला म्हणतात अक्कल, अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली. विजय मिळवताना अकलेचा वापर झाला म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकलो. आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे आहे, असंही राणे म्हणाले. तसेच शिवसेनेने नितेश राणेंबाबत जी पोस्टरबाजी केली त्यावरून देखील नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली. यांची लायकी फक्त पोस्टरबाजी करण्याची आहे, असं म्हणत त्यांनी सेनेवर प्रहार केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष राणेंच्या ताब्यात होती. मात्र, 2019 साली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली होती. याचे फळ अखेर राणे यांना मिळाले आहे. आता या बँकेवर भाजपची सत्ता आहे. सिंधुदुर्गातील देवदेवता आणि कार्यकर्त्यांच्या मदतीनं आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.