नितेश कुठे.. हे सांगायला मी काय मूर्ख आहे का? - नारायण राणे

Narayan Rane on Nitesh Rane
Narayan Rane on Nitesh Raneesakal
Updated on

शिवसेनेच्या नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी नितेश राणे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांना राज्य सरकार अटक करणार, अशी चर्चा असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच नितेश राणे यांच्यासाठी एवढे पोलीसबळ का लावले, असा प्रश्न उपस्थित केला. नितेश राणे कुठे आहेत, यावरही राणे बोलले. नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. (Narayan Rane)

राणेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

जिल्हा बँक जिंकण्यासाठी ते धडपडतायत, जिल्हा बँकेत केलेली पापं लपवण्यासाठी हे चाललंय, सत्तेचा दुरुपयोग आहे.

राज्याचे अतिरिक्त पोलिस संचालक इथे कशासाठी आले, दहशतवादी आलेत का इथे, असं काय घडलं, खरचटलं, मारहाण झाली तर तुम्ही एवढे पोलिस, अशा प्रकारे शोध, सगळीकडे अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतात. आमदाराचा काय संबंध नाही, आमदार मारायला होता का, तुम्ही नाव गोवायचं आणि निवडणुकीपर्यंत गोवण्यासाठी ३०७ लावायचं. खरचटल्यावर ३०७ लागते हे पहिल्यांदाच पाहिलं. मृत्यू होतो तेव्हा ३०७ कलम लावतात.

कोण अजित पवार? त्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप

तिन पक्षाचे असो किंवा चार, या राज्याला सरकार आहे की नाही , माहिती नाही. अर्थमंत्री आले तर लघु पाटबंधारे खात्याला १३ कोटींची तरतूद साडेसहा कोटी पाठवले, एकही निविदा नाही, पूर, वादळ झालं अजून मदत नाही, कसलं सरकार

विधिमंडळात सगळ्यात चांगलं काम नितेश करतो, त्याचीच पोटदुखी आहे. पायरीवर बोलायला काही बंधन नाही, मग काय हरकत आहे. अजित पवार यांनी आज असभ्य वागणूक करणाऱ्या आमदारांचे कान टोचले. त्यांनी अध्यक्षांना या प्रकणावर तत्काळ ऑक्शन घेण्याचं सुचवलं. यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर राणे यांनी कोण अजित पवार? मी ओळखत नाही, असं म्हटलं. अजित पवारांना, कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांचे काय संदर्भ देता म्हणत राणे पत्रकारांवर भडकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.