राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. नाशिक, पुणे आणि महाडमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत युवा सेनेच्या वतीने आंदोलन पुकारलं आहे. यासह राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. राज्यात शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध राणे असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडीचं अपडेट इथं पाहा (Narayan Rane News Today Live Updates)
नारायण राणेंना महाडच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस राणेंना घेऊन महाडकडे रवाना झाले आहेत.
ठाकरे सरकारकडून लोकशाही मूल्यांचं उल्लंघन झालं आहे. जनआशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळं सरकार चिंतेत आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले आहेत.
नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजप नेते राजभवनावर गेले आहेत.
नारायण राणेंना रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचं असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.
नारायण राणे जेवण करत असताना पोलिसांची धक्काबुक्की केली. त्यांच्या हातात ताट असताना त्यांना अक्षरश: खेचलं. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी बोलावलं होतं. पण, त्यांना तपासणी करु दिली नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे, असं मोठं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं आहे.
नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आणलं
नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपकडून जनआशीर्वाद यात्रा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली आहे. जनआशीर्वाद यात्रेचे आयोजक जठार यांनी यांसदर्भातील माहिती दिली आहे. जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहील, असंही ते म्हणाले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक
नारायण राणे यांची तब्येत बिघडली आहे. बीपी आणि ब्लड प्रेशर वाढल्याची माहिती. तपासणीसाठी सरकारी डॉक्टरांचं पथक दाखल
अटक करायला आलेले पोलीस अटक वॉरंट दाखवत नाहीत - जठार
मुंबई उच्च न्यायालयाकडून नारायण राणे यांना दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने राणेंच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राणे यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
आम्ही कोणी मुंबईत नसताना आमच्या घरासमोर आंदोलन केलं. यावर मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनीच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवली असल्याचा आरोप आमदार नितेश राणे म्हणाले.
नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळून लावण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांनी आता मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी नारायण राणे प्रकरणावर बोलणं टाळलं आहे.
भाजप कार्यालयावर हल्ला केल्यास सहन केला जाणार नाही - फडणवीस
राणेंना अटक केली तरी जनआशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रविण दरेकर आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ती सुरुच राहिल - फडणवीस
राज्यातील पोलिसांचा गैरवापर करण्यात येतोय - फडणवीस
केंद्रीय मंत्री असा की, बादशहा असा; कायदेशीर कारवाई होणारच, राणे ज्या शाळेत शिकले ती शाळा अजून अबाधित आहे; शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
नाशिक पोलिस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? - फडणवीस
राणेंच्या विधानाच्या पाठीशी भाजप नाही, पण राणेंच्या पाठीशी मात्र पक्ष उभा आहे - फडणवीस
बोलण्याच्या भरात नारायण राणे बोलले असतील, मुख्यमंत्री पदाबाबत बोलत असताना संयम बाळगणं गरजेचं, पण त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईचं समर्थन केलं जाऊ शकत नाही : देवेंद्र फडणवीस
नारायण राणे यांच्यावरील सरकारच्या कारवाईचं समर्थन केलं जाऊ शकत नाही - फडणवीस
बोलण्याच्या भरात नारायण बोलले असतील, मुख्यमंत्र्यावर बोलताना संयम बाळगायला हवा होता - फडणवीस
राणेंच्या वक्तव्याने राज्यात मोठा वाद निर्माण झालाय - फडणवीस
केंद्रीय मंत्री असो की बादशाह, कारवाई होणारच - संजय राऊत
केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नारायण राणे यांची फोनवर चर्चा, अमित शाह यांज राणे यांना हम आपके साथ है अस सांगितलं
थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
जनआशिर्वाद यात्रेदरम्यान शिवसेना-भाजप यांच्यामध्ये राडा, संगमेश्वरमध्ये तणावाचं वातावरण
राज्यात सत्ता पण विरोधकांसाठी 12 जण आलेत - राणे
काही दिवसांनी शिवसेना सत्तेत नसेल - राणे
कोकणात नवे उद्योग सुरु करणार, त्यासाठीच मोदींनी मला मंत्रिपद दिलेय - राणे
हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपद मिळवले - राणे
नारायण राणेंच्या विरोधात डोंबिवलीत इंदिरा चौकात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या प्रतिमेला 'चप्पल मारो' आंदोलन करीत कोंबड्या उडवीत घोषणा बाजी करत आंदोलन केले. यावेळी रामनगर पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली.
नागपूरमध्येही शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नारायण राणेंविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सिंधुदुर्गातून रत्नागिरीत येणाऱ्या नितेश राणेंचा पोलिसांनी रोखलं आहे. तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. पोलिसांनी मारहाण करण्याची भाषा केल्याचं नितेश राणे म्हणालेत.
नाशिकमध्ये युवासेनेकडून भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्येही रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलंय. राज्यातील अनेक भागात भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या घराकडे मोर्चा वळवलाय. यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला.
पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन मॉलवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलीय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालकीचा हा मॉल आहे. काही वेळापूर्वीच शिवसेनेने गुडलक चौकात आंदोलन केले, त्यानंतर मॉलवर सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केलीय. ज्यात मॉलबाहेरील शोकेसची काच फुटलीय, सध्या आर डेक्कन मॉलचे शटर बंद करण्यात आले आहे.
राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नाशिकमध्ये शिवसैनिकांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेक. याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी माहिती दिली आहे.
औरंगाबाद - नारायण राणे यांच्याविरोधात औरंगाबादमधील क्रांती चौकात शिवसेनेतर्फे आंदोलन
मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाची सुरक्षा वाढवली. प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त. नाशिक मधील भाजपच्या कार्यालय हल्ला झाल्यानंतर सुरक्षेत वाढ..
आताची भाजप खरेच वाजपेयींची भाजप आहे का? सरदेसाई
थोड्याच वेळात युवासेनेची ताकद काय असेल ते दिसेल - वरुण सरदेसाई
सांगली : नारायण राणे यांच्या पोस्टरला शिवसेना कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.
नारायण राणे यांची मी पणाची भाषा लोकशाहीला योग्य नाही - दादा भुसे
नारायण राणे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्याची गरज आहे - दादा भुसे
नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून ओबाड-ढोबड असले तरी आतून मलई सारखे आहेत, ते त्यांच्यासोबत असलो की कळते - चंद्रकांत पाटील
औरंगाबादमधील क्रांती चौकात शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन केलं
चिपळूणमध्ये नारायण राणेंविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
नारायण राणे यांचा ताफा चिपळूणमध्ये दाखल, भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने
कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरु आहे - नाशिक पोलिस आयुक्त
उद्धव ठाकरे मोदींना चोर म्हणाले होते, त्याचं काय झालं? - चंद्रकांत पाटील
जनआशिर्वाद यात्रा ठरल्याप्रमाणेच होणार, नारायण राणे यांची माहिती
मी शिवसेनाला घाबरत नाही - नारायण राणे
माझी बदनामी करु नका - नारायण राणे
अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का? - राणेंनी सोडला टीकेचा बाण
मी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हाच शिवसेना गेली - राणे
मी जे बोललो ते चुकीचं नाही, पोलिसांनी तपासून पाहावं - राणे
राणेंनी आपल्या वक्तव्याचं केलं समर्थन
प्रसाद लाड यांच्याविरोधात मुख्यमंत्री बोलले तेव्हा गुन्हा का दाखल झाला नाही - राणे
तक्रारदाराला ओळखत नाही - नारायण राणे
मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही - नारायण राणे
राणेंच्या पोस्टरला शिवसैनिकांनी फासलं काळं
नारायण राणे मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याचं वृत्त
नारायण राणे यांची भाजपच्या कार्यक्रमात हजेरी, मुख्यमंत्र्यावरील विधानावर बोलण्यास नकार
अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांनी प्रक्रिया सुरु केली आहे. वकिलांसोबत त्यांची चर्चा सुरु आहे.
नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, मोदींना लिहिणार पत्र - विनायक राऊत
भुताच्या हातात कोलीत दिल्यानंतर काय होतेय? याचा प्रत्यय भाजपला येत असेल - विनायक राऊत
राणेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झालाय - विनायक राऊत
नारायण राणे सध्या ऑक्सिजनवर आहे त्यांची हवाही शिवसेनेने काढलेली आहे. शिवसेनेवर टीका करण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे, त्याच्यामुळे नारायण राणे काय करतात याची आम्हाला अजिबात चिंता नाही - मनीषा कायंदे
थोड्याच वेळात नारायण राणे यांची पत्रकार परिषद, काय बोलणार राणे?
उद्धव ठाकरे यांची दसरा मेळाव्याची भाषणं काढा अन् त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा - चंद्रकांत पाटील
नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही कारवाई करु - संजय गायकवाड
राणे साहेब अटक झाले, तर महाराष्ट्रातील सगळे कार्यकर्ते अटक होऊन देतील. 100 % जेलभरो आंदोलन होईल - प्रमोद जठार
नारायण राणेंच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नाही : प्रमोद जठार
नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पुणे पोलीस पथक चिपळूणला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे पुणे युवा सरचिटणीस रोहित रमेश कदम (रा. पाषाण) यांनी तक्रार दिली होती. पुणे पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाले आहे. या पथकामध्ये दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
धास्तावलेलं राज्यातील सरकार रडीचा डाव खेळतेय - राम कदम
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
- निलेश राणे
नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त
नारायण राणेंसोबत बोलणं झालेलं नाही - बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची माहिती
राणे यांच्या चिपळूणमधील कार्यक्रमात कोणताही बदल नाही, आजचा नियोजित कार्यक्रम होणार
भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे - गुलाबराव पाटील
शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब थोड्या वेळेत खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल करणार आहेत. जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी माहिती दिली. औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिस ठाण्यांमध्ये 11 वाजता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे तक्रार देण्यासाठी पोहोचणार आहेत..
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. रोहित कदम याने केला गुन्हा दाखल. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात गुन्हा दाखल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.