मुंबई - वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दररोज यावरून राजकीय टीका टीप्पणी होत आहे. त्यात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची एन्ट्री झाली आहे. राणे यांनी आधीच्या सरकारवर कडाडून टीका करत यापुढे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचं म्हटलं आहे.
नारायण राणे म्हणाले की, देशाचा मी मंत्री असलो तरी महाराष्ट्राच्या बाजुने आहे. विरोधकांना काहीही कामधंदा नाही. अडीच वर्षे मातोश्रीमध्ये बसून सरकार चालवलं. वैयक्तीक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे महाराष्ट्रातून उद्योग गेल्याचं राणे म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवरही टीका केली. शरद पवारांच्या तीन पक्षाच्या राजवटीतही उद्योगांना पोषक वातावरण नव्हतं, असं त्यांनी म्हटलं.
राज्यात उद्योग आणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आता आमचे उद्योगमंत्री पुढे काम करतील. सरकारला जागेवर बसू तर द्या. शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती का घडली नाही, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. तर काँग्रेसमध्ये कोण राहात नाहीये. सर्व राज्यात काँग्रेस संपत आली आहे. राहुल गांधी रॅली करत आहेत. पण त्यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रवस केवळ मनोरंजनासाठी आहे, असंही राणे यांनी म्हटलं.
"वेदांता प्रकल्पाच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प देण्याचं आमिष केंद्र सरकारकडून दाखवलं जात आहे. मात्र याला काही अर्थ नाही. ही तर लहान मुलांची समजूत काढल्यासारखं आहे. पण तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. वेदांताकडून असे अनेक प्रकल्प गुजरातला हलवले आहेत. त्यामुळे आता यावर चर्चा करून काही फायदा नाही" असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.