Narayan Rane: बाळासाहेबांना शब्द दिलाय की, कोणत्याही ठाकरेंना....; नारायण राणे यांचा घणाघात

भाजप नेते आणि लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचे मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे.
Narayan Rane uddhav Thackeray
Narayan Rane uddhav Thackerayesakal
Updated on

नवी दिल्ली- भाजप नेते आणि लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचे मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. कोणत्याच ठाकरेंचं वाईट करणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिलाय, म्हणून शांत बसलोय, अशी टीका राणे यांनी केली. (Narayan Rane said i gave word to Balasaheb Thackeray)

३१ तारखेला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा झाली. या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि टीकाकारांची व्ययक्तिक औकात किती आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले. पण, आता दिल्लीत जात आहेत. आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत, असं राणे म्हणाले. (uddhav Thackeray India alliance bjp shivsena)

Narayan Rane uddhav Thackeray
AAP MLAs Allegations Against BJP: भाजपमध्ये सामील होण्यासाठी मिळाली तब्बल 'इतक्या' कोटींची ऑफर; AAP आमदाराने दाखल केला FIR

आमचा पक्ष सगळ्यात मोठा

ठाकरेंच्या बाजूने खासदार पाच आणि आमदार १६ आहेत. येणाऱ्या निवडणुकीत फक्त पाच आमदार राहतील. अशा लोकांनी रामलीला मैदानात जाऊन बोलणं किती योग्य आहे. त्यांची राजकीय उंची काय? पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची राजकीय आणि बौद्धिक उंची नाही. केवळ मुख्यमंत्री झाले म्हणून बोलणार का? अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.

आमचे ३०३ खासदार आहेत, तुमचे केवळ पाच आहेत. पानावर टाकण्याइतकी चटणी देखील नाही. हे काय बोलतात पंतप्रधानांवर. मोदींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मोदींचा पक्ष तडीपार करा म्हणतात, आमची केंद्रात अन् राज्यात सत्ता आहे. तडीपार करायचं असेल तर आम्ही कुणाला करु? कोरोनामध्ये औषधांचे पैसे खाणाऱ्यांना तडीपार करु, असं ते म्हणाले.

Narayan Rane uddhav Thackeray
Uddhav Thackeray : भाजपचे बिंग फुटल्यानेच कारवाई; केजरीवालांच्या अटकेवरून सरकारवर टीका - उद्धव ठाकरे

ठाकरेंची पात्रता काय?

उद्धव ठाकरे स्वत:ला काय समजतात माहिती नाही? बहुतेक त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. पंतप्रधानांवर बोलण्याइतकी यांच्यामध्ये लायकी, पात्रता, गुणवत्ता नाही. तरी हे तडीपारची भाषा करतात. जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा आहे, असं राणे म्हणाले.

शिवसेनेत मी चाळीस वर्ष होतो. आम्ही कधीही मातोश्रीवर रिकाम्या हाताने गेलो नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा काय व्यवसाय आहे. सामना वृत्तपत्र चालवतात. कोरोना काळातही सामनाला नफा कसा झाला? असा सवाल नारायण राणे यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.