तोंड न उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन; राणेंचा गौप्यस्फोट

'राजकीय हेतूने मुद्दामून आमच्यावर दबाव टाकून आमच्यावर केस करण्याच प्रयत्न केला'
तोंड न उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन; राणेंचा गौप्यस्फोट
Updated on
Summary

'राजकीय हेतूने मुद्दामून आमच्यावर दबाव टाकून आमच्यावर केस करण्याच प्रयत्न केला'

दिशा सलियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांची काल तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. राणे पिता-पुत्रांवर (Narayan Rane) दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. दरम्यान, मी सुरुवातीपासून जे घडलं ती सर्व माहिती माझ्या स्टेटमेंटमध्ये दिली असून सुशांत आणि दिशाची हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhva Thackeray) यांचा दोनवेळा फोन आला होता, असा गौफ्यस्फोट मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. आता त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण आता कोणतं वळण घेणार यावर चर्चा सुरु आहे.

यावेळी राणे म्हणाले मला उद्धव ठाकरे यांचा कॉल आला होता. ते म्हणाले सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका, एका मंत्र्यांची गाडी होती असं बोलू नका, असे स्पष्ट करत राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केला आहे. सलग नऊ तासाच्या चौकशीनंतर राणे बाहेर आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

तोंड न उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन; राणेंचा गौप्यस्फोट
राणे पिता पुत्रांची रात्र पोलीस ठाण्यातच? कार्यकर्ते संतप्त, पोलिसांचा लाठीचार्ज

यावेळी नारायण राणे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना बोललो असं का बोलायचं नाही? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तुम्हालाही मुले आहेत. तुम्ही असं काही करु नका. पण माझं हे वाक्य वगळण्यात आलं. म्हणजेच, राजकीय हेतूने मुद्दामून आमच्यावर दबाव टाकून आमच्यावर केस करण्याच प्रयत्न केला गेला. पण आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही.

काय म्हणाले नारायण राणे

मला दोन दिवसांपूर्वी मालवणी पोलिस ठाण्यामधून एक नोटीस आली होती. दिशाच्या (Disha-Salian) आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगण्यासाठी बोलावण्यात आल्यांच सांगण्यात आले. पण दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, तिचे खरे आरोपी पकडले गेले पाहिजेत असे आम्ही वारंवार बोलत होतो. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दिशाच्या कुटुबियांकडे जात त्यांना तक्रार करण्यासाठी प्रवृत्त केलं. दिशाला न्याय मिळवण्याची मागणी असताना तिची आई म्हणते बदनामी होते, अशी खोटी तक्रार पोलिस ठाण्यात दिली असल्याचे ते म्हणाले आहेत.

तोंड न उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन; राणेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी कॉंग्रेस हा गांधी-नेहरूंची विचारधारा मानणारा पक्ष : पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.