Devendra Fadnavis : "मोदीजींनी लस तयार केली, नाहीतर कटोरा घेऊन उभे असतो", देवेंद्र फडणवीसांचे अजब विधान

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Updated on

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सावरकरांचा अपमान सहन करणार का?, सत्तेसाठी लाचार होणार का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते मोदी@९ निमित्त धाराशिव येथे विशाल जाहीर सभेत बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडून दिल्याचे जाहीर करा , असे फडणवीस उद्धव ठाकरे यांना म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा देखील गौरव केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतल्या जात आहे. मोदीजींनी खूप गोष्टी या देशात केल्या. आज आपण शांत बसून शकतो कारण कोरोना काळात मोदींनी दोन वेळा मोफत लस टोचली. म्हणून आपण सर्व आज उपस्थित आहोत. साडेसतरा कोटी मोफत लसी देण्याचे काम मोदींनी केले.

Devendra Fadnavis
Mumbai : महिला लोकल डब्यात सकाळी गस्त वाढवा; चित्रा वाघ यांची रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ पाच देश लस तयार करु शकले यामध्ये भारत देश आहे. १४० कोटी भारतीयांना लस दिली. जागात १०० देशांना ही लस पुरवली.

"मी परवा मॉरीशसला गेलो होतो. त्याठीकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याकरीता मॉरीशसच्या पंतप्रधानांसोबत माझा कार्यक्रम होता. त्यानंतर मी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. तेव्हा राष्ट्रपती म्हणाले मोदीजींना आमचे धन्यवाद सांगा. ते मला ज्यावेळी लोक कोरोनाने मरत होते त्यावेळी मोदींनी लसी पाठवल्या. आमचा देश मोदींमुळे जिवंत आहे", असे फडणवीस यांनी सांगितले.

मोदीजींनी लस तयार केली नसती तर काय अवस्था झाली असती. आम्ही अमेरिका,रशियासमोर कटोरा घेऊन उभे राहिलो असतो. आम्हाला लस, आम्हाला लस द्या. करोडो-करोडो लोक मरून गेले असते.  मात्र मोदींनी लस तयार केली आणि आज भारत उभा आहे, असे विधान देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Devendra Fadnavis
Cyclone Biporjoy: 94 प्राण्यांचा मृत्यू, 34 लोक जखमी अन्...; चक्रीवादळानं केलंय गुजरातमध्ये मोठ नुकसान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.