मराठा आरक्षणाची मागणी आता पुन्हा जोर धरु लागलीय.
मुंबई : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी आता पुन्हा जोर धरु लागलीय. मराठा क्रांती ठोक मोर्चानं (Maratha Kranti Thok Morcha) आता सरकारला अल्टिमेटम दिलाय. मराठा आरक्षणाशिवाय निवडणुकांचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडू, असाही इशारा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलाय. दरम्यान, आता नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनीही मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन मौजे भांबेरी, जि. जालना येथील मनोज जरांगे पाटील (Manoj Patil) यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेलं आमरण उपोषण आणि त्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं.
नरेंद्र पाटलांनी (Narendra Patil) मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. त्यानंतर मुख्यमंत्री मराठा समाजासाठी लवकरच बैठक घेणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. आरक्षणासह इतर मागण्या तातडीनं मार्गी लावू, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आश्वासन दिलंय. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळं सध्याचं नवं सरकार त्याबाबत काय पाऊलं उचलणार हे पाहावे लागेल.
सकाळी मंत्रालय इथं एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर नरेंद्र पाटील यांना मंत्रिमंडळाची पहिली बैठक असल्याकारणानं मुख्यमंत्र्यांनी रात्रीची वेळ दिली होती. ज्यावेळी रात्री भेट झाली, त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी उपोषणकर्ते आणि त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली, तसेच तातडीनं संयुक्त बैठक घेऊन मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु, फोन न लागल्यामुळं साहेबांनी उपोषणकर्त्यांना सदर व्हिडिओद्वारे निरोप दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.