Narhari Zirwal: लोकसभा निवडणुकीपूर्वी झिरवळ यांचे मोठं वक्तव्य, 'पुढील दीड वर्षात अजित पवार...'

काही दिवसांमध्ये राज्यात भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या चर्चा रोज राजकीय वर्तुळात सुरू
Narhari Zirwal
Narhari Zirwalesakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या चर्चा रोज राजकीय वर्तुळात सुरू असतात. काहीचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर देखील लावण्यात आले होते. अशातच भावी मुख्यमंत्री जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे अजित पवार. आता खुद्द विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी देखील पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री असं म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचा वारंवार भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातो. त्यातच पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हंटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा भावी मुख्यंमत्री हा विषय चर्चेत आला आहे.

नरहरी झिरवाळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही वक्तव्य केलं. त्यानंतर कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला. नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे या दोघांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

Narhari Zirwal
Sharad Pawar: राष्ट्रवादीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला! शरद पवारांनी कामाला लागण्याचे दिले आदेश

नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रीया

नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या भाष्याला अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. भाषणावेळी अजित पवार म्हणाले की, "अमुक एक मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आता वक्ते बोलले, पण भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ पाहिजे."(Latest Marathi News)

Narhari Zirwal
Amol Kolhe: शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले, 'मी पुन्हा येईल म्हणण्याची...'

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरु आहे. समर्थक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, नाना पटोले, अजित पवार या सर्वांना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून वारंवार भावी मुख्यमंत्री, किंवा दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असा उल्लेख केला जात आहे.(Latest Marathi News)

Narhari Zirwal
Ajit Pawar: '...नाहीतर कानाखाली आवाज काढीन', अजित पवारांची पक्षातील नेत्यांना तंबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.