Sharad Pawar : बबन घोलपांच्या मुलाने घेतली शरद पवारांची भेट; ठाकरे गटाच्या नाराज नेत्याला पवार बळ देणार का?

Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on

नाशिकः जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते बबन घोलप यांनी आपली नाराजी बोलून दाखवत त्यांच्या संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर ते पक्षाला रामराम ठोकतील, अशा चर्चा सर्वत्र होऊ लागल्या होत्या. त्यातच आता त्यांच्या मुलाने शरद पवारांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता घोलप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का? या चर्चांना उधाण आले आहे.

बबन घोलप हे नशिकसह उत्तर महाराष्ट्रमधील अत्यंत जूने शिवसैनिक. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेसोबत ते जोडले गेले होते. देवळाली या मतदारसंघातून बबन घोलप यांना १९८५ ला उमेदवारी देण्यात आली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र १९९० सलच्या निवडणुकीत ते निवडून आले आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले. त्यानंतर या मतदार संघात तब्बल पंचवीस वर्षे बबनराव घोलप यांनी प्रतिनिधित्व केले. समाजकल्याण मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री म्हणूनदेखील त्यांनी धुरा सांभाळली.

Sharad Pawar
IND vs SL : सिराजने लंका पेटवली; गतविजेत्यांच्या नावावर खराब रेकॉर्डची झाली नोंद

बेहिशोबी मालमत्तेचा आरोप

१९९९ ला तत्कालीन युती सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री असताना घोलप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सेक्रेटरी मिलिंद यवतकर यांनी सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती. घोलप यांनी १९९९ मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ व चर्मोद्योग महामंडळात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. घोलप यांच्या मालमत्तेत मंत्री झाल्यावर मोठी वाढ झाली होती. या चार महामंडळातील आठ कोटी रुपयांची ठेव बुडीत गेलेल्या अवामी को. ऑप. बँकेत गुंतविण्यात आली होती. घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता असल्याचा यवतकर यांनी आरोप केला होता. त्यामूळे त्यांच्यावर निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली. त्यांचा हा खटला अजूनही सुरू आहे. त्यामुळे २०१४ ला त्यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना तिकीट देण्यात आले. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. त्यांनी पाच वर्षे या मतदारसंघात आमदार म्हणून काम केले आहे.

2019ला देखील योगेश घोलप यांनी शिवसेनेने उमेदवारी दिली. मात्र सरोज आहिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत योगेश घोलप यांना मात दिली. त्यानंतर बबन घोलप फार सक्रिय दिसत नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बबन घोलप उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे त्यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी देण्याचे कबूल केले होते. दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात घेऊन घोलप यांना मोठा धक्का दिला. शिवाय लोकसभा संपर्क नेते प्रमुखांची जबाबदारी माजी आमदार विलास शिंदे यांच्याकडे दिल्यामुळे घोलप यांचा पत्ता कट झाल्याची चाहूल लागल्याने घोलप आणि उपनेतेपदाचाही राजीनामा दिला आहे.

Sharad Pawar
गोफण | पत्रकारांवर बहिष्कार घालणाऱ्यांनी परिषदेत येऊ नये!

आता बबन घोलप आणि त्यांचे सुपुत्र योगेश घोलप पक्षात नाराज असल्याचं दिसून आलं. यासह विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनीदेखील राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटाची वाट निवडली. त्यामुळे शरद पवारांना देखील या मतदारसंघात आपल वर्चस्व टिकवण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबईत शरद पवार यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे घोलप राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.