Nashik Lok Sabha Constituency: नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांची माघार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मानले आभार

Lok Sabha Constituency : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढविणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
chhagan Bhujbal
chhagan Bhujbalesakal
Updated on

मुंबई, नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढविणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (ता. १९) मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की होळीच्या दिवशी अजितदादा पवार यांचा निरोप आला म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली. (Nashik chhagan Bhujbal withdrawal from Nashik Lok Sabha Constituency )

त्यांनी दिल्लीचा निरोप दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. बैठकीत नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली, तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांच्यासाठी जागा मागितली; परंतु अमित शहा यांनी माझं नाव सांगितलं. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी मी एक दिवसाची वेळ मागितली. मात्र, दुसऱ्या दिवशीही माझंच नाव फायनल झाल्याचं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी नाशिकला येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या नेत्यांनी उमेदवार जाहीर करावा

ते म्हणाले, की नाशिकमध्ये माझी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. नाशिकच्या विकासासाठी मराठा, दलित, ब्राह्मण, ओबीसी यासह सर्व समाजांनी पाठिंबा दिला. त्यानुसार आम्ही तयारी करण्यास सुरवात केली. मात्र, तीन आठवड्यांचा वेळ होऊन उमेदवारी जाहीर झाली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू झाला असून, तीन आठवड्यांपासून ते मतदारसंघात फिरत असून, त्यांचा प्रचार पुढे गेला आहे. अधिक उशीर होत असल्याने महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.(latest marathi news)

chhagan Bhujbal
Nashik Lok Sabha Constituency : पोस्टल मतदारांची संख्या घटली! 14 हजार कर्मचारी प्रत्यक्ष बूथवरच बजावणार हक्क

सर्वांचे आभार...

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवलं होतं. त्यांनी दाखविलेल्या आग्रहाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच, नाशिकच्या विकासाकडे पाहून मराठा समाजासह विविध समाजबांधव, विविध पक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांनी मला जो पाठिंबा दिला, त्यांचेही आभार मानतो.

भुजबळांच्या मनाचा मोठेपणा...

''नाशिकमधील शिवसैनिकांच्या भावना जाणून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी घेतलेला निर्णय म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्याबद्दल शिवसेनेकडून (शिंदे गट) मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आता नाशिकमधील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची आमची जबाबदारी वाढली आहे.''-अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

chhagan Bhujbal
Nashik Lok Sabha Constituency : भाजपला 5 वर्षात आज माझी आठवण आली का? हरिश्चंद्र चव्हाण यांचा भारती पवारांवर हल्लाबोल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.