Darewadi School : "दप्तर घ्या, शेळ्या द्या"; विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासन नमले

प्रशासनाच्या असा काय निर्णय घेतला?
Student
StudentSakal
Updated on

नाशिक : "दप्तर घ्या, शेळ्या द्या..." असं म्हणत विद्यार्थ्यांचा मोर्चा थेट जिल्हा परिषदेवर धडकला. पण त्यांचं ऐकतं कोण? विद्यार्थ्यांवर ही वेळ का व कशी आली हे आपल्याला माहितीये का? नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत प्रशासनाला शाळा सुरू करण्याची मागणी केली. या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

(Nashik Darewadi School Starts)

Student
Shivsena: ऋतुजा लटकेसुद्धा जाणार होत्या शिंदे गटात; हळूहळू उघडतायेत पत्ते

दरम्यान, दरेवाडी येथील धरणग्रस्त नागरिकांची वस्तीवर विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तर विद्यार्थ्यांना जवळच्या दुसऱ्या शाळेत हलवण्यात आलं होतं. तर ही शाळा परत सुरू व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष चालू होता. त्यांनी जिल्हा परिषदेच्या गेटवर शेळ्या आणि पोस्टर घेऊन आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

"आमच्या गावातील मुलांची संख्याही जास्त आहे पण शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला जर शाळा देता येत नसेल तर आमच्या मुलांना शेळ्या द्या, आम्ही त्यांना शेळ्यामागे पाठवतो" असा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()