Nashik Dhol News : नाशिक ढोल पथकांचा निनाद देशात गुंजणार! राज्यातील शहरांसह परराज्यातूनही मागणी

Dhol Tasha
Dhol Tashaesakal
Updated on

Nashik Dhol News : ढोल पथकांमधील वादक ते वाजवत असलेली धून नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या आगमन सोहळ्यासाठी ढोल पथके सज्ज झाली असून नाशिक ढोल पथकांचा निनाद देशभरात गुंजणार आहे.

नाशिक ढोल पथकांच्या वादकांना देशभरातून मागणी आहे.

आतापर्यंत पथक प्रमुखांकडे हैदराबाद, गुजरात, बिहार, मध्यप्रदेश येथील मंडळांनी वादनासाठी विचारणा केलेली आहे, तर राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील शहरांमधूनही नाशिक ढोल पथकांना मागणी आहे. नाशिक शहरात जवळपास ३० ढोल पथके आहेत. (Nashik dhol teams are in demand from all over country news)

त्यामुळे जवळपास सात हजारांहून अधिक वादक सज्ज झाले आहेत. बाप्पाचे आगमण व विसर्जनासाठी पथकांकडून बुकींगला चांगला प्रतिसाद मिळत असून काही पथकांचे बुकींग फुल्ल झाले आहे.

मंडळाने केलेल्या सहकार्यानुसार त्यांनी केलेल्या मागणीनुसार वादकांची संख्या ठरते. मागणीनुसार पथकांनी बुकींग केली आहे. वादकांच्या दिमतीला पथकांमध्ये स्वयंसेवकही दिमतीला असतात, त्यामुळे त्या प्रकारे ढोल वादकांचे नियोजन सुरू आहे.

मंडळांसाठी बसविला वेगळा ताल

नाशिक ढोलचा निनाद देशभर गुंजतो, गणेशोत्सवात लाखो भक्त नाशिक ढोलवर नृत्य करताना दिसतात. आता नाशिकच्या ढोल पथकांकडून मंडळांसाठी आगमन आणि विसर्जनासाठी वेगळा ताल बसविला आहे, त्यामुळे ढोल पथकांचे वेगळेपण नाशिककरांना अनुभवायला मिळणार असून विविध नव्या तालांवर नाशिकची तरुणाई थिरकणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhol Tasha
Ganeshotsav 2023 : पर्यावरणपूरक गोमय गणपतीबाप्पा! गायीच्या शेणाने दिला प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय

"मानाच्या रविवार कारंजा मित्रमंडळासाठी मिरवणुकीत २१ ध्वजांसह पथकातील साडेचारशे सदस्य ढोल वादन करणार आहोत. अडीचशे तरुणी, महिलांचा सहभाग असून १७ मंडळांची बुकिंग झाली आहे. पथकाकडे परराज्यातूनही नोंदणी करण्यासाठी विचारणा झाली आहे." -अमी छेडा, स्थापनाप्रमुख, सहस्त्रनाद वाद्यपथक

"ढोल पथकांची महिन्यापासून तयारी सुरू आहे. पथकात विद्यार्थ्यांसह पालकही सहभागी होत आहे. राज्यातील विविध शहरांसह परराज्यातून पथकाला मागणी आहे. यंदा नव्या वादकांची संख्या वाढली असून पथकात ३५० हून अधिक सदस्य आहेत." - हृषीकेश कालेवार, पथकप्रमुख वरदविनायक, ढोल ताशा पथक

"ढोल पथकांना यंदा चांगला प्रतिसाद आहे. महिनाभरापासून ढोल वादक तयारी करत आहे. ढोल पथकांना जागेच्या उपलब्धतेबाबत अडचणी आहेत. विविध अडचणींवर मात करून गणेशोत्सव आगमनाचा उत्साह शिगेला पोचला आहे. संस्कृती, परंपरा टिकविण्यासाठी ढोल पथकातील वादक सज्ज झाली आहेत." - सर्जेराव वाघ, उपाध्यक्ष, ढोल-ताशा समिती नाशिक

Dhol Tasha
Ganeshotsav 2023: बाप्पाच्या आगमनासाठी मंडळांची जय्यत तयारी! नाशिककरांना मिरवणुकीत मिळणार वेगळी अनूभूती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.