Onion Import : अफगाणिस्तानचा कांदा भारतात आणू नका! शेतकरी संघटनेचे केंद्राला साकडे

Onion Import : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे.
Onion Import
Onion Importesakal
Updated on

Onion Import : अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये, यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे. ‘दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तान येथून कांदा आयात केला आहे. ( Farmers Associations statement on import of afghanistan to Central Govt )

महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेल्या रब्बी कांद्याचा मुबलक प्रमाणात साठा असून, केंद्र सरकारही बफर स्टॉकच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा साठवून ठेवत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत आता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे. असे असताना देशात कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे,’ असे श्री. दिघोळे यांनी निवेदनात म्हटले आहे. (latest marathi news)

Onion Import
Onion Import : नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात होणार नाही, नाफेडमार्फत विक्रीही नाही- भारती पवार

शेतकऱ्यांच्या कांद्याला पुढील काळातही चांगला दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने तत्काळ अफगाणिस्तानसह इतर कोणत्याही देशातून भारतात कांदा आयात करता येऊच नये यासाठी १०० टक्के कांदा आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे. सरकारने मागील सहा महिन्यांत लादलेले ४० टक्के निर्यातशुल्क व ५५० डॉलर किमान निर्यातमूल्य हेही तत्काळ हटवावे, अशी मागणीही जिल्हाधिकारींमार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली.

केंद्राने आयातबंदी व निर्यातीवरील शुल्क पूर्णपणे हटविण्याचे वरील दोन्ही निर्णय घ्यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलने केले जातील, असा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून मागण्यांचे निवेदन शुक्रवारी (ता. १२) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले. निवेदनावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा समन्वयक भगवान जाधव, सदस्य विश्वनाथ पाटील, खंडू फडे आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Onion Import
Onion Import : बांगलादेशकडून कांद्याची आयात खुली होण्याची भारताला प्रतीक्षा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.