नाशिक : राज्यातील पाच विधानपरिषद निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये नाशिकची निवडणूक पहिल्यापासूनच चर्चेत राहिली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हेच निवडून येतील असा दावा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला आहे. (Nashik Graduate Election Result Satyajit Tambe will be elected in Nashik Ajit Pawar claim)
अजित पवार म्हणाले, "नाशिक विभागात जे घडलं, खरतंतर माझ्यासारख्यानं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाबाबत बोलणं हे उचित नाही. पण एकेकाळी सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. पक्षाशी बांधिलकी असणारा नवा चेहरा म्हणून पक्षानं जर उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं"
शेवटी नाईलाजास्तव त्यांना अपक्ष उभं रहावं लागलं त्यानंतर काही वेगळ्या प्रकारचा निर्णय झाला. पण त्याचं अख्ख घराणं त्यांचे वडील-आजोबा हे काँग्रेसच्या विचारांचे आहेत. त्यामुळं माझा अंदाज असा आहे की सत्याजीत तांबे सध्या निवडणुकीत पुढे आहेत आणि तेच निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर ते योग्य निर्णय घेतील, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.