Bribery: लाचखोरीत नाशिक आघाडीवर, पुणे कितव्या क्रमांकावर? अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यास काय करायचे? ACB ने सांगितला उपाय

Pune And Nashik Bribery: मुंबईसारख्या महानगरात उद्योजक, व्यावसायिक, कॉर्पोरेट कंपन्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला झटपट काम करून घेण्यात रस असतो, अधिकाऱ्याने मागितलेली लाच गैर वाटत नाही.
Nashik leads in bribery, Pune ranks second
Nashik leads in bribery, Pune ranks secondEsakal
Updated on

Nashik leads in bribery, Pune ranks second:

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ताज्या अहवालानुसार या वर्षातील पहिल्या सात महिन्यांत राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक पाहिल्या तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. यात छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या स्थानी आहे.

सुरुवातीच्या सात महिन्यांची आकडेवारी पाहिल्यास लाचखोर शासकीय अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी १९ सापळा कारवाया करण्यात आल्या. अन्य भ्रष्टाचार आणि ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याबद्दल प्रत्येकी एक गुन्हा नोंद करण्यात आला.

मुंबई विभागात एकूण २१ गुन्हे दाखल झाले त्यात ३० आरोपींना अटक करण्यात आली. याच काळात उर्वरित महाराष्ट्रात एकूण ४३३ गुन्हे नोंद करण्यात आले. त्यावरून मुंबई विभागातील लाचखोरीचे प्रमाण निव्वळ ४.६२ टक्के इतके निघते. नाशिक विभाग (९६ गुन्हे, २१.१४ टक्के) पाहिला क्रमांक राखेल, असे चित्र आहे.

दुसऱ्या क्रमांकावर पुणे (८६ गुन्हे, १८.९४ टक्के), तर तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर (७६ गुन्हे १६.७४ टक्के) हे विभाग येतात. एकूण आठ विभागांपैकी मुंबई लाचखोरीत सगळ्यात शेवटी आठव्या क्रमांकावर आहे.

शाहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील जनता शासकीय योजना आणि अधिक अवलंबून असते. मुंबईचे उदाहरण घेतल्यास इथे खासगी सेवा किंवा योजना विकत घेण्याचा कल अधिक आढळतो. शिवाय मुंबईसारख्या महानगरात उद्योजक, व्यावसायिक, कॉर्पोरेट कंपन्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला झटपट काम करून घेण्यात रस असतो, अधिकाऱ्याने मागितलेली लाच गैर वाटत नाही. शिवाय लाच घेण्यास भाग पाडून आपले काम कमीत कमी वेळेत करून घेण्याची प्रवृत्ती इथे आढळते. त्यामुळे तक्रारींचा ओघ घटतो.
प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलिस महासंचालक
Nashik leads in bribery, Pune ranks second
Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार? अजित पवार महायुतीतून पडणार बाहेर? कोणी रचला चक्रव्यूह

तक्रारी करण्याचे एसीबीचे आवाहन

एसीबी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, जशा तक्रारी येतात तशी कारवाई केली जाते. शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास नागरिकांनी एसीबीशी संपर्क साधावा, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र शासकीय कामे किंवा सेवा पैसे दिल्याशिवाय मिळत नाहीत, हा विचार सर्वसामान्यांच्या मनामनात भिनला आहे. त्यामुळे शासकीय कामे विनामूल्य झाली की प्रत्येकाला आश्चर्य वाटते. बहुधा त्यामुळेच शासकीय अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पैशांच्या मागणीत नागरिकांना गैर काहीच वाटत नाही. ही वस्तुस्थिती असल्यास तक्रारी तरी कशा होतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Nashik leads in bribery, Pune ranks second
Amit Thackeray: अमित ठाकरे लढवणार विधानसभा निवडणूक? मोठी अपडेट आली समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.