Rain Updates : नाशिकमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; काही ठिकाणी गारांचा वर्षाव

Rain Updates
Rain Updatesesakal
Updated on

नाशिकः दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागामध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी मात्र नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

नाशिकमधल्या कसबे, मौजे सुकेने आणि परिसरात बिगर मौसमी पाऊस कोसळत आहे. तर सुकेने परिसरात गारांचा वर्षात झाला. यासह सिन्नर परिसरातदेखील पाऊस कोसळत आहे. आठवडा बाजार असल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली.

सुकेने, सिन्नरसह चांदोरी परिसरामध्येही गारांचा पाऊस कोसळला आहे. अवकाळी कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शनिवारी पुण्याच्या काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावली होती.

Rain Updates
OBC Melava : ''मी भुजबळांसोबत युती करायला तयार'', महादेव जानकरांनी स्पष्ट केली भूमिका

सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका

हवामान विभागाने दर्शवल्याप्रमाणे सिन्नर तालुक्यात रविवारी दुपारी तीन वाजेच्या पुढे तसेच पाच वाजता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली शनिवारी पाच वाजता पावसाने हजेरी लावले असता सगळीकडे पाणीच पाणी होते.

रविवारी सिन्नर शहरातील आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची धावपळ उडाली असता सिन्नर तालुक्यात अनेक गावात या पावसाने हजेरी लावली अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेले बघवास मिळाले.

Rain Updates
Pune Rain Update : फुरसुंगी मध्ये पावसाचे पाणी सोसायटीमध्ये

सिन्नर शेजारी निफाड असलेल्या तालुक्यात खूपच नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. सिन्नर शहरातही पाच ते सहा वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणीच पाणी होते. तसेच दुपारी आकाशात काळे ढग साचुन आल्याने सगळीकडे अंधकार पसरला होता.

Rain Updates
Rain Update: पुढील 2 दिवस पावसाची शक्‍यता; उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.