Trimbakeshwar Temple: 'नाशिकमधील 'ती' मशीद नसून नाथ सांप्रदायातील मंदिर', अनिकेत शास्त्रींच्या दाव्याने खळबळ

Trimbakeshwar Temple Controversy
Trimbakeshwar Temple Controversyesakal
Updated on

Nashik News: त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात शनिवारी (ता. १३) रात्री काही तरुणांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली होती.

आज नाशिकच्या अनिकेत शास्त्री यांनी एक दावा करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. त्र्यंबकेश्वर येथील हजरत गुलाब शहावली ही मशीद नसून एक मंदिर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. (Latest Marathi News)

Trimbakeshwar Temple Controversy
Sameer Wankhede: NCBच्या अधिकाऱ्यांकडून वानखेडेंविरोधात कट, वकिलांचा गंभीर आरोप; उपस्थित केले अनेक प्रश्न

काय म्हणाले अनिकेत शास्त्री?

त्र्यंबकेश्वरमधील हजरत सय्यद गुलाब शहावली ही मस्जिद नसून नाथ संप्रदायातील मंदिर आहे. येथे तीन भूयारं आहेत. त्यात गणपती आणि इतर देवतांच्या मूर्ती आहेत. या दर्ग्यावर नाथ सांप्रयातील चिन्ह अंकित असल्याचं शास्त्री म्हणतात.

अनिकेत शास्त्री पुढे म्हणाले की, ज्ञानवापीप्रमाणे याही मशिदीचं सर्वेक्षण पुरातत्व खात्याने करावं, तरच सत्य बाहेर येईल. (Marathi Tajya Batmya)

Trimbakeshwar Temple Controversy
D. K. Shivakumar: सिद्धरामय्या माझे बॉस नाहीत! उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेपूर्वी शिवकुमार गरजले

त्या दिवशी काय घडलं?

आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर राज्यात गहजब झाला होता.

यावेळी 10 ते 12 युवकानी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेथे बंदोबस्तास असलेले एमएसएफ जवानांनी त्यांना रोखले. आपणास आत जाता येणार नाही, असे सांगीतले. त्यानंतर जवळपास 15 मिनेट त्यांच्या हुज्जत झाली. मात्र अखेर प्रवेश न घेता ते तरुण तेथून पुढे निघून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()