राष्ट्रीय तपास संस्थेनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे.
NIA Raids PFI : राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) कोल्हापूर, नवी मुंबई, पुणे, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज केरळ, तामिळनाडू (Tamil Nadu), कर्नाटकसह 10 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India PFI) अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एनआयए आणि ईडीनं या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली आहे. या कारवाईत तपास यंत्रणेनं आणखी 100 जणांना अटक केली आहे.
याच पार्श्वभूमीवर एनआयएनं कोल्हापुरातही (Kolhapur) छापा टाकला आहे. काही दिवसांपूर्वी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून हुपरी इथं छापा टाकत दोन तरूणांना ताब्यात घेतलं होतं. आज पुन्हा कोल्हापुरात छापा टाकल्यानं परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. खबरदारी म्हणून कमालीची गुप्तता पाळण्यात आलीय.
एनआयएनं महाराष्ट्रात 20 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आलीय. पहाटे कारवाई करत एटीएसनं महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई इथं मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड इथं आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.