National Milk Day : मेट्रोच्या वादात सापडलेला आरे एकेकाळी दुधाचा ड्रीम प्रोजेक्ट होता

संपुर्ण भारतात २६ नोव्हेंबर राष्ट्रीय दुध दिवस म्हणून साजरा केला जातो.
National Milk Day
National Milk Daysakal
Updated on

आज राष्ट्रीय दुध दिवस. माणसाच्या आयुष्यात दुध हा महत्त्वाचा घटक आहे. खाण्यापासून पिण्यापर्यंत दुध हे गरजेचं आहे. भारतातील प्रसिद्ध असलेली अमूल मिल्क प्रोडक्ट कंपनीची स्थापना करणारे डॉक्टर वर्गीज कुरियन यांचा आज जन्मदिवस. त्यामुळे संपुर्ण भारतात २६ नोव्हेंबर राष्ट्रीय दुध दिवस म्हणून साजरा केला जातो.

अमूल दूध ब्रॅन्ड प्रमाणे महाराष्ट्रातील दूध संघटनांचा विकास का झाला नाही? मग त्यात गोकूळ, वारणा, कृष्णा, आरे, महानंद इत्यादी. यामागे अनेक कारणे आहेत. पण तुम्हाला आज आम्ही अशा दुधाच्या ड्रिम प्रोजेक्टविषयी सांगणार आहोत, ज्याचा इतिहास वाचून तुम्ही थक्क व्हाल. (National Milk Day Aarey Milk Colony Indian dream project read story)

आरे म्हटलं की आपल्यासमोर येतं आरे कारशेड प्रकल्प आणि त्यावरुन झालेला वाद. पण तुम्हाला माहिती आहे का एकेकाळी आरे हा भारताचा सर्वात मोठा दुध प्रकल्प होता.

दुसरे महायुद्धानंतर देशात आणि खास करुन मुंबईत हलाखीचे दिवस आले होते. मुबलक पाणी नाही, अन्नधान्य नाही, नोकरी नाही. आणि त्यात एक नवी गोष्ट अॅड झाली होती ती म्हणजे मुबलक दुध नव्हतं. दुध नसल्याने लोणी आणि तुपाची मागणी आणि भाव दोन्ही वाढले होते.

मग सरकारने अनुदानित भावाने दूध वाटप करण्यास सुरवात केली. या दरम्यान मुंबईत वितरणाची केंद्रे उभी करण्यात आली. आधी  रेशन कार्डावर नंतर मिल्क कार्डावर म्युनिसीपालिटीच्या अनेक केंद्रातून दुधाचे वितरण सुरु झाले पण दुधाची कमतरता मात्र संपली नाही.

यावर ब्रिटिश सरकारने तोडगा काढत मुंबईसाठी “मिल्क कमिशनर” नेमला. यातुन “बॉम्बे मिल्क स्कीम” ची घोषणा करण्यात आली. या स्किमद्वारे मुंबईला दुध पुरवण्याची जबाबदारी होती. पण एवढ्या मुंबईला दुध पुरवायचं कस? हा सर्वात मोठा प्रश्न होता. अशावेळी दुध गुजरातमध्ये सरदार पटेल यांच्या प्रेरणेने १९४५ साली सुरु झालेल्या दुध सोसायट्याकडूंन दुध मुंबईकडे आणण्याचे ठरवले

National Milk Day
Jalgaon District Milk Union Election : कामाच्या विश्‍वासावर ‘मविआ’ ला यश मिळणार

पण गुजरात ते मुंबईपर्यंत दूध आणणे हे खूप जोखमीचं काम होतं. एवढा वेळ दूध टिकून राहण्यासाठी पाश्चरायझेशन करावे लागते. त्यामुळे गुजरातच्या सर्व सोसायट्या ‘पोल्सन’ कंपनीला दुध पुरवायच्या. पोल्सन पाश्चरायझेशन करून तेच दुध BMS ला पुरवायचे.

पुढे पोल्सनकडून तक्रारी यायला लागल्या  दुधाला वास येत आहे, दुधात माशा पडल्या आहेत, असे कारणं सांगून दुध खरेदी करायचा नाही. पोल्सनचा अगाऊपणा त्रिभुवनदास पटेलने खोडण्याचा प्रयत्न केला. पोल्सनला मध्यस्थ न ठेवता थेट शेतकऱ्यांकडून दूध घ्यावे अशी मागणी त्यांनी बॉम्बे मिल्क कमिशनरला केली. मात्र ही मागणी फेटाळून लावली.

बॉम्बे मिल्क कमिशनरने दारा खुरोडी या असिस्टंट कमिशनरला शेतकऱ्यांना समजवण्यास पाठवले पण खुरोडींनी पोल्सनला वगळून थेट सोसायटीतून दुध घेण्याचा सल्ला मिल्क कमिशनरला दिला. नंतरच्या काळात पोल्सन -कैरा सोसायटी- दारा खुरोडी या सर्वांमध्ये अंतर्गत राजकारण सुरु झाले. यातूनच कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटीचे(अमूल) आणि दारा खुरोडी यांच्या कुरबुरीतूनच  'आरे मिल्क कॉलनी' चा जन्म झाला. १९६१ साली या कॉलनीचे पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते उदघाटन झाले.

National Milk Day
District Milk Union Jalgaon : अखाद्यचा गुंता सोडविण्यासाठी SIT स्थापन करावी

आरे कॉलनीचे दुग्धोत्पादन दिवसाला तीन लाख लिटर पर्यंत पोहचले होते. आपले संपूर्ण आयुष्य दूग्धोत्पादन व्यवसायाला वाहून घेतलेल्या दारा खुरोडींना पुढे १९६३ साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

National Milk Day
District Milk Union : संशयितांचे संचालक मंडळाकडे बोट?

महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हायची होती. तेव्हा गुजरातहून मुंबईला दुध यायचे. १९६० साली गुजरातसह महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हे दोन कट्टर विरोधक वेगवेगळ्या राज्यात गेले. मुंबईत आरे तर गुजरातमध्ये कैरा डिस्ट्रीक्ट सोसायटी आपआपले काम करू लागले. पण पुढे आरेचा फारसा विकास झाला नाही आणि आरे मागे पडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.