युवा दिन विशेष | 23 वर्षांचा पुस्तकप्रेमी मोईन कसा बनला इतरांसाठी आदर्श?

युवा दिनानिमित्त आपण गावातील एका अशा युवकला भेटणार आहोत जो पुस्तके फक्त वाचतच नाही, तर इतरांना ती वाचण्यासाठी मदतही करतो.
National Youth Day the story of moin kabra from buldhana district
National Youth Day the story of moin kabra from buldhana districtesakal
Updated on
Summary

युवा दिनानिमित्त आपण गावातील एका अशा युवकला भेटणार आहोत जो पुस्तके फक्त वाचतच नाही, तर इतरांना ती वाचण्यासाठी मदतही करतो.

भारतातील थोर पुरुष आणि महान विचारवंत स्वामी विवेकानंद (Swami Vivekandanda) यांची जयंती आज 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. देशभरात हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचे अतिशय साधे जीवन आणि त्यांचे महान विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत. युवा दिनानिमित्त आपण गावातील एका अशा युवकला भेटणार आहोत जो पुस्तके फक्त वाचतच नाही, तर इतरांना ती वाचण्यासाठी मदतही करतो.

National Youth Day the story of moin kabra from buldhana district
‘युवा’ लेखकांना सुवर्णसंधी; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्राचा विशेष प्रकल्प

मोईन हारून काबरा (Moin kabra) असं या तरुणाचं नाव. २३ वर्षांचा मोईन बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार (Lonar) तालुक्यातील सुलतानपूर (Sultanpur) गावात राहतो. गावात बाहेरच्या साईडला असलेल्या एका बौद्ध वाडयात तो राहतो आणि तेथेच अभ्यास करतो. तिथे कुठलेही शैक्षणिक वातावरण (Educational environment) नाही किंवा वाचनाला चालना मिळेल, असं संसाधन देखील नाही. त्याच्या संपूर्ण कुटुंबात मोईन एकमेव शिक्षित व्यक्ती आहे. वैचारिक चर्चा करायला, अभ्यासाच्या गोष्टीवर बोलायला, गल्लीत कोणी मित्र नाहीत किंवा मार्गदर्शन करायला कोणी शिक्षित व्यक्तीही नाही. इयत्ता 7 वी पर्यंत त्याने शाळा कशी शिकली हे त्याचं त्यालाच अप्रुप वाटतं. कारण शाळेच्या वेळेत तो नदीवर मासे पकडायला जायचा किंवा बकरी चारायला घेऊन जायचा आणि मग ढकल गाडी असाच पास व्हायचा. मात्र सातवीत त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)यांचा एक मराठी चित्रपट पाहिला अन् त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला.

मोईन त्याच्या प्रवासाविषयी सांगतो की, “मी या चित्रपटातून प्रेरणा घेऊन शिक्षणाकडे आकर्षित झालो. नियमितपणे शाळेत जाऊ लागलो. रोज अभ्यास करु लागलो. यातूनच मग पुढे मी भविष्याबद्दल विचार करायला लागलो. पण गल्लीत/गावात मार्गदर्शन करायला किंवा पुढचा मार्ग दाखवायला मला कोणीच नव्हतं. म्हणून मी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरासारखं पुस्तकांना जवळ केलं, पुस्तकांशी मैत्री केली. पुस्तके वाचत सुटलो. आता पुस्तके मला जवळची वाटू लागली. पुस्तकांमुळे मला स्वतःमध्ये फरक जाणवू लागला. त्यामुळे माझी वाचनाची आवड ही वाढतंच गेली. “वेगवेगळी पुस्तके सेविंग केलेल्या पैशातून संग्रही करून वाचणं माझा एक छंद बनला. मी पुस्तकांच्या सानिध्यातच जास्तीत जास्त वेळ घालवू लागलो.

National Youth Day the story of moin kabra from buldhana district
गिरोलीत बांधावरच केला कृषी दिन साजरा; युवा शेतकऱ्याचे कौतुक

पुस्तकांनी मला व्यवस्थित बोलायला, वागायला, स्वप्न पाहायला आणि मुख्य म्हणजे लिहायला शिकवलं. मी आतापर्यंत 400 पुस्तके वाचले आहेत आणि 750 पुस्तके माझ्याकडे आहेत. “पुढे मी पुस्तक वाचल्यानंतर त्यावर स्वतःचा अनुभव लिहू लागलो. पुस्तक फक्त वाचायचंच नाही, तर ते समजूनसुद्धा घेण्यावर भर देऊ लागलो. सोशल मीडियावर आल्यावर मी येथे सर्वप्रथम पुस्तकांबद्दल लिहिलं आणि ते इतरांना आवडलंसुद्धा. यामुळे मी जमेल तसं सोशल मीडियावर लिहू लागलो. वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकांबद्दल इतरांना माहिती देऊ लागलो. “पुस्तक समीक्षण लिहीत असताना मी पुस्तकासंबंधीत इतर बाबतीतसुद्धा सर्वकाही लिहिलं.

उदा. पुस्तक वाचनाचे फायदे, पुस्तके का वाचावीत, मी पुस्तके कशी वाचतो, का वाचतो, माझं वाचन, प्रवास, बेकायदेशीर pdf का वाचू नये, Ebook Vs Book, पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याविषयावर लिहिलं. “आणि हेच माझ्या वाचकांना खूप भावलं आणि पटलं. त्यामुळे वेगवेगळे पुस्तक प्रेमी मित्र संपर्कात आले आणि आमची एक साखळी जुडली. “पुढे यातूनच मला इतरांना पुस्तके सवलतीत मिळावी यासाठी एक उपक्रम सुरू करायची कल्पना सुचली. मी त्यावर काम केलं आणि तो उपक्रमसुद्धा यशस्वीपणे राबवला. “उपक्रमातून असंख्य वाचनप्रेमी मित्रांना हवी असलेली वाचनीय पुस्तके सवलतीत घरपोच मिळवून दिली. कारण या उपक्रमामागे दर्जेदार पुस्तके देशातील छोट्या मोठ्या भागात राहत असलेल्या पुस्तक प्रेमींना स्वस्तात मिळावी आणि वाचन प्रसार व्हावा हा प्रामाणिक उद्देश होता. “आता हे सर्वकाही सांगायचा मुद्दा हा की सुरुवातीला मला पुस्तके विकत घेता येत नव्हती.

National Youth Day the story of moin kabra from buldhana district
युवा चित्रकाराकडून बेघरांना मदत

पैशांची चणचण असायची. पुस्तके कशी घ्यावी हे कळत नव्हतं. माझी वाचनासाठी कुचंबणा व्हायची. तिच कुचंबणा इतर वाचकांची होऊ नये म्हणून मी आज वाचन करत असतानाच इतरांना सोशल मीडियाचा योग्य वापर करुन वाचनाची आवड असलेल्या लोकांपर्यंत पुस्तके पाठवू शकलो, हे फक्त वाचनामुळेच झालं. “कुठलेही पुस्तक शॉप नसतांना हजारो वाचकांनी माझ्यावर विश्वास ठेवून पुस्तके मागवली, ती फक्त माझं वाचन प्रेम बघूनच आणि यातच माझी जीत आहे, असे मला वाटते.” काही दिवसांपूर्वी लेखक शरद तांदळे यांनी ‘स्वप्निल कोलते साहित्यिक पुरस्कारा’ची घोषणा केली. मोईन हा पुरस्कार पटकावणारा पहिला वाचक ठरला आहे.

तो सांगतो की, “या पुरस्कारमुळे मला जी प्रेरणा मिळाली ती शब्दांत व्यक्त करता येणारी नाही. अजून कितीतरी पटीने प्रचंड वाचनाची प्रेरणा मिळाली आहे. निस्वार्थी भावनेने पुस्तकांवर केलेलं प्रेम आज सार्थकी ठरला आहे. “शेवटी आता जबाबदारी वाढली आहे. अजून खूपकाही वेगळं आणि नवीन करत राहायचं आहे. प्रचंड वाचन करायचं आहे. इतरांनासुद्धा वाचन करण्यासाठी प्रेरित करत राहायचं आहे. उच्चशिक्षित व्हायचं आहे. एकंदरीत हा पुरस्कार आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासाठी एक टॉनिकच आहे. काम करण्यासाठी आणि पुन्हा अजून उंच भरारी घेण्यासाठी ऊर्जा देणाऱ्या आहेत. माझ्या या छोट्याश्या प्रवासामुळे माझ्यासारख्या 1टक्के युवक/युवतीला वाचनाची आवड लागली, त्यांना प्रेरणा मिळाली आणि ते भविष्याबद्दल विचार करू लागले तरी मी यशस्वी झालो असे मी समजेल.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()