चिपळूण : आमदार शेखर निकम (Shekhar Nikam)यांच्या कर्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजप, शिवसेना (BJP,Shivsena)पक्षाला ''जोर का झटका''देत शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोकरे जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या भागातील राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अनेक पदे भोगलेल्यांनी इतर राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कोकरे जिल्हा परिषद गटाच्या या मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या जाहीर मेळाव्याने राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
मेळाव्यात भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल चव्हाण यांच्यासह असुर्डेचे उपसरपंच महेंद्र नरोटे, दत्ताराम बने, कुटरे ग्रामपंचायत सदस्य राजाराम घेवले, संभाजी घेवले, गणेश पेंडामकर, जनार्दन लाखन, आत्माराम चांदिवडे, येगांवचे विठ्ठल चव्हाण, अमर चव्हाण, प्रमोद भिंगार्डे, अजय घाग, प्रदीप घाग, बाळू नांदळे, नांदगाव ढमालवाडी अमोल कदम, महेश काणेकर व सहकारी नांदगाव गुरववाडी वसंत तुळसणकर, राकेश तुळसणकर, नांदगाव रोहिदासवाडी सोनू सावर्डेकर, दिलीप सावर्डेकर, आंबतखोल वेताळवाडी सुरेश खापरे, शांताराम खापरे, तळवडे पातेचे दगडू निकम व सहकारी कुशीवडे शिगवणवाडी महेंद्र शिवगण व सहकारी यांच्यासह प्रमुख शेकडो शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आमदार निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागा जिंकायच्याच आहेत.
आमदार शेखर निकम म्हणाले, आपण सर्वजणच गेली दोन वर्षे कोरोना महामारी, वादळ, महापूर अशा अनेक समस्यांवर मात करीत आहोत. त्यात आपला जनसंपर्कसुद्धा दुरावला होता. अशा कठीण प्रसंगात संपूर्ण मतदारसंघात विविध ठिकाणी अनेक योजनांमार्फत विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागा जिंकायच्याच आहेत. कोणी कोठे गेले तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लागेल ती ताकद माझ्याकडून मी देईन.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.