Navale bridge accident : चालत्या कारचे ब्रेक फेल झाले, तर या गोष्टी त्वरीत करा

बहुतेक लोक ब्रेक फेल झाल्यावर घाबरून जातात. पण अशावेळी घाबरून न जाता समजदारीने काम करायला हवं.
Navale bridge accident
Navale bridge accidentesakal
Updated on

What To Do When Car Brakes Will Fail : नुकताच नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ब्रेक फेल झाल्यामुळे साधरण एकाच वेळी ४५ गाड्यांचा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे हायवेवर अनेकदा अपघात होताना दिसतात. कधी गाड्या पलटतात, तर कधी डिव्हायडर फोडून दुसऱ्या गाड्यांवर आदळतात अशा घटना अनेकदा ऐकायला मिळतात.

पण असा ब्रेक फेल झाल्यावर नेमकं काय करावं आणि काय करू नये हे माहित असणं आवश्यक आहे. यामुळे आपण मोठं नुकसान टाळू शकतो.

Navale bridge accident
Winter Car Care : चुकूनही या गोष्टी कारमध्ये विसरू नका, हिवाळ्यात ठरू शकतात धोकादायक

ब्रेक फेल झाल्यावर काय करू नये

  • रिव्हर्स गेयर चुकूनही वापरू नका. मागून येणाऱ्या गाड्यांशी अपघाताची शक्यता असते.

  • कार न्युट्रलवर आणू नका, त्यामुळे कार वरचा कंट्रोल गमवला जातो.

  • हायस्पीडमध्ये एकदम बँडब्रेक लावू नका. जास्त वेगात हँडब्रेक लावल्याने मागचे व्हील्स लॉक होतात आणि कार उलटण्याची शक्याता असते.

Navale bridge accident
CNG Car: गुड न्युज! आता टोयोटाच्या 'या' दोन गाड्यांना मिळणार CNG चा पर्याय

ही काळजी घ्या

  • पुन्हा पुन्हा ब्रेक दाबत राहा. योग्य प्रेशर पडल्यावर ब्रेक लागण्याची शक्यता असते.

  • इमर्जंसी लाइट आणि हॉर्नचा वापर करावा. त्यामुळे बॅटरीची पॉवर वापरली जाऊन पॉवर सप्लाय कमी होतो आणि गाडी स्लो होते.

  • वरच्या गेअरवर कमी करावे.

  • इतरांना हॉर्न, हॅझार्ड लाइट्स, इंडिकेटर आणि हेडलाइट्स डीपर करून सुचित करावे.

  • आजूबाजूला रेती, वाळू असेल तर गाडी त्यात घालून वेग कमी करू शकतात.

  • फक्त क्लचचा वापर करावा. एक्सलेटर अजिबात वापरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.