'नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीनं तपास करायला हवा.'
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दाऊदशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतलं, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीनं तपास करायला हवा. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. ईडी (ED) या प्रकरणाची चौकशी करेल का? असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केलाय.
'तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावाला (Yusuf Lakdawala) याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. युसूफ लकडावाला याचे डी. गँगशीही संबंध होते. माझा प्रश्न आहे की, ईडीनं याची चौकशी केली का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, असंही राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिलं असून देशानं आभार मानावे, असं सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मागासवर्गीय असल्यानं भेदभावपूर्ण आणि मानवी हक्क नाकारले जात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील एक सीसीटीव्ही फूटेज ट्वीट केलंय.
संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरूय. राणा दाम्पत्यानं मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावलेत. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी म्हटलं. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिलं असून देशाने संजय पांडेंचं आभार मानले पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राणा यांच्याशी मुंबई पोलीस सौजन्याने वागले असल्याचे दिसून आल्याचंही त्यांनी म्हटलंय. या प्रतिक्रियेनंतर त्यांनी एक ट्विट करुन नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.