Navneet Rana : उद्धव ठाकरे राज्यासाठी संकट होते... हनुमान चालिसा प्रकरणावर नवनीत राणा काय म्हणाल्या; पाहा Exclusive Interview

Navneet Rana Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Navneet Rana Exclusive Interview Amravati Lok Sabha election 2024 Uddhav Thackeray Marathi Politics News
Navneet Rana Exclusive Interview Amravati Lok Sabha election 2024 Uddhav Thackeray Marathi Politics News
Updated on

राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण पाहायाला मिळत आहे. या निवडणुकीत विदर्भातील अमरावती लोकसभा मतदार संघात भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मॉडेलिंग, अभिनय ते खासदार असा प्रवास राहिलेल्या नवनीत राणा यांच्या राजकीय कारकिर्दीत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत.

त्यांच्या एकंदरीत या प्रवासाबद्दल सकाळचे समुह संपादक सम्राट फडणीस यांनी नवनीत राणा यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी राणा यांनी राज्यातील राजकारण तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. (Navneet Rana Exclusive Interview )

यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल देखील भाष्य केलं. त्यांना हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून तुमच्यावर तुरूंगात जाण्याची देखील वेळ आली, तेव्हा तुमच्या भावना काय होत्या? असा प्रश्न विचारण्यात आला.

दरम्यान या प्रश्नाला उत्तर देताना नवनीत राणा यांनी सांगितलं की, माझ्यासाठी ती खूप भीषण गोष्ट होती. हा विषय आला तरी... मुलं घरी वाट पाहात असताना एका नवरा-बायकोला तुरुंगात पाठवण्यात आलं. हे झालं कशासाठी? जेव्हा मी घरी बसले होते, पोलीस प्रशासनाच्या सर्व आदेशांचे पालन करत होते... फक्त एक घोषणा झाली होती. आम्ही राजकारणात असल्याने आम्ही केलेली घोषणा शंभर टक्के कोणत्यातरी विषयाशी जोडलेली असते.

Navneet Rana Exclusive Interview Amravati Lok Sabha election 2024 Uddhav Thackeray Marathi Politics News
Live In Relationship: पत्नीप्रमाणे दीर्घकाळ सोबत राहणाऱ्या महिलेलाही द्यावी लागणार पोटगी, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

राज्यात एखादं संकट आम्हाला वाटलं... उद्धव ठाकरे हे संकट म्हणून आपल्या राज्याला मिळाले... कारण ३३ महिने आपल्या राज्याचा प्रमुख, जो सेवा करण्यासाठी पदावर आहेत.... तो ३३ महिने मुख्यमंत्री असताना घरातून पाय बाहेर काढत नाही, तो माझ्यासाठी संकटच होता. म्हणून त्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करणे हा माझा उद्देश होता. फक्त एक शब्द मी बोलले होते, फक्त एक शब्द बोलल्यानंतर एवढा कोप माझ्यावर येईल असा विचार मी स्वप्नात देखील केला नव्हता, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

Navneet Rana Exclusive Interview Amravati Lok Sabha election 2024 Uddhav Thackeray Marathi Politics News
Chinmay Mandlekar: "ट्रोलर्समुळे तुझ्या करिअरचे निर्णय बदलू नकोस"; चिन्मयच्या निर्णयावर अवधूत गुप्तेनी दिला सल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.