नागपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा हे तब्बल ३६ दिवसांनी पुन्हा अमरावतीत परतणार आहे. दरम्यान त्याआधी ते नागपुरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. पोलिसांनी त्यांच्या या चालीसा पठणासाठी काही अटींसहित परवानगी दिली आहे. दरम्यान त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली आहे. त्यांनाही पोलिसांनी परवानगी दिली असून राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि राणा समर्थकांमध्ये आमनेसामने येणार आहेत.
(Navneet Rana Hanuman Chalisa Controversy)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य ३६ दिवसांपूर्वी अमरावतीतून बाहेर पडले होते. त्यानंतर झालेल्या अनपेक्षित घटनांमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. या दिवसांत त्यांनी जेलची हवाही खाल्ली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन आपल्याला पोलिसांनी चांगली वागणूक दिली नाही अशी तक्रार केली होती.
या सगळ्या प्रकरणानंतर राणा दाम्पत्य पुन्हा अमरावतीत जाणार आहे. त्याआधी ते नागपुरातील एका हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यासाठी त्यांना काही अटींसह परवानगी देण्यात आली आहे. पण त्याच मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांंनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि राणा समर्थक पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. यावेळी दोन गटात वाद होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.