अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या नावे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारं एक पत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. या पत्रातून त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राणांना धोका असल्याची सूचना या पत्रातून देण्यात आली आहे. हे पत्र कोणी पाठवलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण त्यातील मजकुरानुसार एका शासकीय कर्मचाऱ्यानं हे पत्र पाठवल्याचं सांगितलं जात आहे. (Navneet Rana Letter to Navneet Rana excitement with advice to be vigilant)
राणा यांचं अमरावतीतील घरी हे पत्र रात्रीच्या सुमारास कोणीतरी गेटजवळ ठेऊन दिलं. सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्यानं ते पाहिल आणि राणांच्या बंधुंकडे सुपूर्द केलं. त्यानंतर हे पत्र वाचल्यानंतर त्यांना धक्काच बसला.
काय म्हटलंय पत्रात?
या पत्रात असं म्हटलंय की, राजस्थानच्या बॉर्डरवरुन काही लोक अमरावतीत आले आहेत. मी एक सरकारी नोकरदार असून तुम्हाला मी मानतो. माझ्या आणि माझ्या वडिलांच्या बदलीसाठी तुम्ही प्रयत्न केले होते. त्यामुळं तुम्ही सावध रहायला हवं.
याप्रकरणी नवनीत राणा काय म्हणाल्या?
मी सध्या अमरावतीत नाही मुंबईत आहे. मला कार्यकर्त्यांकडून या पत्राची माहिती मिळाली. मी त्यांना मदत केल्याचा उल्लेख आहे. पण कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही एवढी हिंम्मत करुन कोणी हे पत्र कसं ठेऊन गेलं हा प्रश्न आहे? मला वाटतं की, आमच्या अमरावतीत जे कोल्हे हत्या प्रकरण झालं त्याचा मी ज्या पद्धतीनं फोलोअप घेतला, त्यामुळं हे आलं असावं. तसेच अन्यायाविरोधात लढण्याची धुरा मी हातात घेतली असून तो लढा मी सुरुच ठेवणार आहे. अशा पत्रामुळं कुटुंबाला भीती वाटू शकते. पण या पत्रात शुभचिंतक असल्याचं त्यांनी म्हटलंय पण ते खरंच सल्ला आहे की धमकी हे माहिती नाही. कारण त्यात उल्लेख केला आहे की, "मै आल्लाह से दुवा करुंगा आप ठिक ठाक रहें" यामुळं थोडी भीती वाटते पण मी कोल्हे प्रकरणावर लढतच राहणार.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.