नवाब मलिक यांनी दाऊदच्या माणसांकडून जमीन विकत घेतली - फडणवीस

Devendra Fadnavis-Nawab Malik
Devendra Fadnavis-Nawab Malikgoogle
Updated on

मुंबई : ''कुर्ला येथे एलबीएस रोडवरील १ लाख २३ हजार स्केअर फूटची जागा होती. त्याला गोवावाला कंपाऊंड म्हणतात. या जमीनीची एक रजिस्ट्री स़ॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. या जमिनिची विक्री सलिम पटेल आणि शाहवली खान यांनी केली. हे दोघेही दाऊदची माणसं होती. ही सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांची आहे. ज्यांनी खरेदी केली त्यांचं नाव फराज मलिक आहे'', असा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे.

शाहवली खान कोण? -

सरदार शाहवली खान १९९३ बॉम्बब्लास्टचा गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली असून तो तुरुंगात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी शाहवली खानने केली होती. बॉम्ब ब्लास्टबाबत जी बैठक झाली त्यावेळी हा हजर होता. गाडीच्या आत आरडीएक्स भरण्यात आले तोच हा शाहवाली खान होता, असेही फडणवीस म्हणाले.

सलीम पटेल कोण? -

स्वर्गीय आर. आर. पाटील इफ्तार पार्टीत गेले होते. गुन्हेगारांसोबत त्यांचा फोटो दाखविण्यात आला होता. तो दाऊदचा माणूस असल्याचे सांगितले जात होते. यामध्ये आर. आर. पाटलांचा काही दोष नव्हता. मोहम्मद सलिम इशाक पटेल हा दाऊदचा माणूस होता. हसिना पारकरच्या नावाने संपत्ती जमा व्हायची. ते काम सलिम इशाक पटेल करायचा. हा सर्व धंदा दाऊदच्या आशीर्वादाने चालत होता. यामध्ये हसिना पारकरचा सर्वात जवळचा व्यक्ती सलिम होता, असेही फडणवीस म्हणाले.

''मलिक सॉलिडस कंपनीचे संचालक होते'' -

''सॉलिडस कंपनी आज नवाब मलिकांच्या कुटुंबाची आहे. नवाब मलिक देखील या कंपनीचे संचालक राहिले आहेत. नवाब मलिकांनी फक्त ३० लाख रुपयांत जमीन खरेदी केली आहे. आजही सॉलिडस कंपनीने एक खोली भाड्याने दिली आहे. त्याचे १ कोटी रुपये मिळते. हे दोघे कोण होते? हे तुम्हाला माहिती नव्हते का? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. मला अशा अनेक प्रॉपर्टी सापडल्या असून त्यामध्ये अंडरवर्ल्डचा संबंध आहे. हे सर्व पुरावे मी अॅथॉरिटीला देणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

''एलबीएस रोडच्या मागे एक प्रॉपर्टी घेतली होती. ती ४१५ रुपये स्क्वेअर फूटने विकत घेतली होती. सॉलिडसने या दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन २० रुपये स्क्वेअर फूटाने विकत घेतली आहे. मुंबईच्या हत्याराकडून ही जमीन विकत घेण्याची काय गरज होती.? मुंबईच्या हत्यारासोबत धंदा करायची काय गरज होती?'' असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.