"मला बोलण्याचा अधिकार, चांदिवाल आयोगानेही मान्य केलं"

नवाब मलिक यांनी आज चांदिवाल आयोगासमोर हजेरी लावली.
nawab malik
nawab malik file photo
Updated on

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज चांदिवाल आयोगा दाखल झाले होते. सचिन वाजेने (Sachin Vaze) नवाब मलिकांविरोधात (Nawab Malik) ईडीकडे (ED) अर्ज केला होता. त्यामुळे नवाब मलिकांना हजर राहण्याचे आदेश चांदिवाल आयोगाने दिले होते. त्यानंतर नवाब मलिकांनी माध्यमांशी संवाद साधला. सचिन वाजेने माझ्या विरोधात चांदिवाल आयोगाचे (Chandiwal Commission) कामकाज सुरू असताना केलेल्या वक्तव्याबाबत अर्ज केला होता. यावर मी आज चांदिवाल आयोगात उपस्थित राहिलो. मी जे आरोप केले ते तपास यंत्रणेच्या तपासात समोर आलेल्या गोष्टी ज्या वर्तमान पत्रांनी छापलेल्या बातम्या होत्या त्या आधारावर केले होते.

nawab malik
"हे घ्या पुरावे..."; रश्मी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर सोमय्या ठाम

नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं की, मी चांदिवाल आयोगाच्या चौकशीबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र तपासात आरोपींनी चुकीच्या गोष्टी केल्याचं समोर आलं आहे. त्यावर बोलण्याचा अधिकार असल्याचं आयोगाने मान्य करत माझ्या विरोधात काढलेली नोटीस मागे घेऊन ती रद्द केली आहे असं नवाब मलिकांनी सांगितलंय.

nawab malik
'बहुत याराना लगता है!'; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.