राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिले नाही - नवाब मलिक

nawab malik
nawab malikesakal
Updated on

मुंबई : नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिले नाही...राणे घाबरले म्हणून त्यांनी पक्ष प्रवेश केला...आता‌ त्यांना काही बक्षिसी मिळाली म्हणून ते‌ काही बोलत आहे...असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी नारायण राणेंवर (narayan rane) केला आहे.

राणेंवर हल्लाबोल

लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला नारायण राणेंनी एका पत्रकार परिषदेत मलिक यांना लगावला होता. नवाब मलिक यांनी 2 नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून इतके पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता. यावेळी मलिकांनी वानखेडे 50 हजारांटे शर्ट पँट वापरतात, असं म्हटलं होतं. याच सगळ्या प्रकरणावर राणेंना प्रश्न विचारला असता राणेंनी मलिकांवर टोलेबाजी केली होती.. त्यानंतर मलिक यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे,

nawab malik
'राऊत साहेब, आपण आपली वसुली कमी करणार आहात का?'

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. ज्यांनी पक्ष‌प्रवेश करुन मंत्रिपद नाही सांगायची गरज‌ नाही. हे सरकार २५ वर्ष‌ चालेल कोणी त्याची काळजी‌करु नये. कोणाच्या कुटुंबापर्यंत मी गेलो नाही. पण ड्रग्जचा पैसा आला तर त्यातून अल्बम बनवला जातो त्यावर गप्प बसायचे का?....

दिवाळीनंतर फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे पुरावे देणार

सध्या दिवाळी सुरू असल्यानं राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबल्या आहेत. मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर बनावट कारवायांचा व खंडणीखोरीचा आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. त्या संदर्भातील काही फोटोही त्यांनी प्रसिद्ध केले होते. फडणवीस यांनी हे आरोप खोडून काढताना मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. दिवाळीनंतर याचे पुरावे देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.नवाब मलिक यांनी फडणवीसांचं हे आव्हान स्वीकारलं आहे. मी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर बुधवारी त्यांनी एक ट्वीट करून हॉटेल 'द ललित'मध्ये अनेक गुपितं दडली असल्याचं म्हटलं आहे. ही गुपितं नेमकी काय आहेत? त्यांचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे की समीर वानखेडे यांच्याशी, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी ट्वीट केलं आहे. 'न खंजर उठेगा, न तलवार इनसे... ये बाजू मेरे आजमाए हुए है।' असं मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.