Nawab Malik  News
Nawab Malik NewsSakal

Nawab Malik: मलिकांना जामीन पण मिडियाशी बोलता येणार नाही, ५० हजारांच्या वैयक्तिक बॅान्डवर होणार मुक्तता

रिलीज ऑर्डरनंतर मलिकांच्या सुटकेचे आदेश जारी होणार
Published on

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जामीनाची प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे. नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केली आहे. या जामिनाची प्रक्रिया आज मुंबई सत्र न्यायालयात पूर्ण केली जाणार आहे. विशेष कोर्टानं रिलीज ऑर्डर दिल्यानंतर मलिकांच्या सुटकेचे आदेश जारी होणार आहेत.

नवाब मलिकांना जामीन देताना कोर्टाने काही अटी घालून दिल्या आहेत. मालिक यांना ५० हजारांच्या वैयक्तिक बॅान्डवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Nawab Malik  News
Sharad Pawar: "भाजपकडून शरद पवारांना 'या' दोन मोठ्या पदांच्या ऑफर" पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान मलिक यांना काही अटी घालुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये मलिक यांच्या प्रकरणातील साक्षीदार व अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवायचा नाही. त्याचबरोबर मलिक यांच्याशी संपर्क होईल तो नंबर ईडीच्या अधिकाऱ्यांना दिला जावा. तसेच मलिकांचा पासपोर्ट ईडीकडे जमा करण्याची अट देखील घातली आहे. त्याचबरोबर कुठल्याही माध्यमाशी संवाद साधायचा नाही, अशी अट देखील घालण्यात आली आहे.

Nawab Malik  News
Sharad Pawar: मलिक कोणत्या गटात? कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वतः शरद पवार करणार चर्चा

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार घेत आहेत. गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक करण्यात आली होती. नवाब मलिकांना 11 ऑगस्टला जामीन मंजूर झाला आहे.

Nawab Malik  News
Himachal Weather Update: हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर! सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, दरड कोसळल्याने रस्ते बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()