मुंबई : अटकेनंतर आता नवाब मलिक (Nawab Malik) यांना कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे विनंती करणार आहोत की त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. (Nawab Malik has no moral right to remain a minister after arrest Chandrakant Patil)
पाटील म्हणाले, कॅबिनेट मंत्री म्हणून पदावर राहण्याचा नवाब मालिक यांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर अधिकर नाही. त्यांनी आता तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु. आता कशाची वाट पहाताय? असा सवालही त्यांनी मलिक यांना केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांवरही आरोप करताना पाटील म्हणाले, एका मंत्र्यानं महिला अत्याचारप्रकरणी राजीनामा दिला आहे. तर दुसऱ्या एका मंत्र्याच्या दोन बायका आहेत जे हिंदू कोड बिलामध्ये बसत नाही. या सरकारने घटना पायदळी तुडवली याची 22 पानी नोट तयार आहे.
अटकेनंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना लढेंगे और जितेंगे अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, ज्या प्रकारची नवाब मलिकांची देहबोली आहे, याला आमच्याकडे ग्रामीणभाषेत कोडगेपणा म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.