मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर (Hasina Parkar) हिला ५५ लाख देऊन जमिनीचा सौदा केला असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांसमोर केला. आज ईडीने नवीन रिमांड अर्ज दाखल केला असून हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिले ही टायपोग्राफीची चूक होती. ते पाच लाख रुपये आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. ईडीने अशी चूक केलीच कशी याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. कोणती रक्कम खरी याचे ही स्ष्टीकरण द्य़ावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तापसे (Mahesh Tapase) यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Malik Hasina Parkar Deal allegations)
ईडीच्या कारवाईने गेल्या काही दिवसापासून राज्यभरात गोंधळ माजला असतानाच आता पुन्हा आज ईडीकडूनच चूक झाली म्हटल्यावर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केला आहे. ईडीने याचा खुलासा केला असला तरी आता यावरून पुन्हा राज्यात वादळ उटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान आता महेश तापसे यांनी याबाबात स्ष्टीकरण द्य़ावे अशी मागणी केली आहे.
नेमके काय घडले
दाऊदची बहीण हसीना पारकरला ५५ लाख रुपये मलिक यांनी दिल्याचा दावा ईडीने यापूर्वीच्या रिमांड अर्जात केला होता. त्याद्वारे टेटर फंडिंगचा आरोप देखील ईडीने केला होता. त्यानंतर आज ईडीने नवीन रिमांड अर्ज दाखल केला असून हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिले ही टायपोग्राफीची चूक होती, ते पाच लाख रुपये आहे, असं म्हटलंय. एएसजी (ASG) अनिल सिंह यांनी रिमांड अर्जातील माहिती वाचून दाखवली. पण, ५ लाख रुपये नाहीतर १ रुपया जरी टेरर फंडींगमध्ये वापरला असेल तर तो गुन्हा आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची ईडी कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सिंह यांनी केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.