घरी 'सरकारी पाहुणे' येणार, त्यांचं स्वागत करतो - नवाब मलिक

'गांधी गोऱ्यांशी लढले, आपण चोरांशी लढू' असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
Nawab-Malik
Nawab-MalikTeam eSakal
Updated on

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आता पर्यंत अनेकदा गंभीर आरोप केले. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वानखेडे यांच्यासहित कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आपल्यावर दबाव निर्माण केला जाऊ शकतो अशी शक्यता नवाब मलिकांनी वर्तवली होती. त्यातच आता पुन्हा एकदा नवाब मलिकांनी एक ट्विट करत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट केलं. 'साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले हैं, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज-रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है. गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.' अशा आशयाचं ट्विट करत नवाब मलिक यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी ED आणि CBI ला सरकारी पाहुणे म्हणत त्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी देखील सरकारी पाहुणे येणार असल्याचे म्हटल्याने, पुढच्या काळात मलिक यांच्यावर तपास यंत्रणांचा ससेमिरा लागू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Nawab-Malik
अनिल परबांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
Nawab-Malik
आंदोलन आता आणखी तीव्र करावे; राजू शेट्टी

दरम्यान, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतंही विधान करणार नाही, अशी हमी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली होती. हीच हमी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टात दिली आहे. नवाब मलिक यांनी हायकोर्टात (Mumbai Highcourt) बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.