मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईवर याआधीही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. एनसीबीने आमचे साक्षीदार हे स्वतंत्र असतात असं एनसीबीने सांगितलं होतं. फ्लेचर पटेल कोण आहे आणि त्याचा वानखेडेशी काय संबंध आहे. कुटुंबासोबत फोटो टाकतात आणि फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे ते सांगावं असा प्रश्न त्यांनी विचारला.
फ्लेचर पटेल कोण आहे? NCB ने खुलासा करावा
त्यांच्या पब्लिसिटीसाठी बरेचसे कार्यक्रम आयोजित करतात असाही आरोप मलिक यांनी केला. कोणतीही घटना घडते, छापेमारी असेल तिथे प्रतिष्ठीत नागरिक यांना बोलावून पंचनामा करण्याची प्रक्रिया असते असे मलिक म्हणाले. फ्लेचर पटेलने कोणते फोटो टाकले, लेडी डॉनचे फोटोही मी ट्विटरवर दिले असल्याचे मलिक यांनी सांगितले
वानखडे पब्लिसिटी साठी हा कार्यक्रम करतो
गेल्या वर्षभरात जे झाले त्याची माहिती आम्ही गोळा केली. त्यात असं समोर आलं की, एका सर्च ऑपरेशनमध्ये २५ नोव्हेंबरला केलेल्या पंचनाम्यात फ्लेचर पटेल पंच आहेत. चांगली गोष्ट आहे. तो प्रतिष्ठित नागरिक आहे. ९ डिसेंबर २०२० साली फ्लेचर पटेल पंच आहेत. आणखी एक पंचनामा आहे. २ जानेवारी २०२१ ला केलेल्या पंचनाम्यातही फ्लेचर पंच आङेत. म्हणजे यांचे स्वतंत्र साक्षीदार हे कुटुंबिय असतात का? म्हणजे हे सगळे पंचनामे आणि कारवाई ठरवून केली असल्याचं दिसून येते. वेगवेगळ्या केसेसमध्ये ठराविक पंच पुन्हा दिसत आहेत..
एनसीबीला उघडं पाडण्याचा इशारा
क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी (mumbai drugs case) एनसीबीने (NCB) केलेली संपूर्ण कारवाईच बोगस असल्याचा दावा करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. क्रूझवरील प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप करत मंत्री नवाब मलिक वारंवार नवा गौप्यस्फोट करत आहेत. नवाब मलिक यांनी आतापर्यंत दोन वेळा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. या कारवाईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचंही त्यांनी उघड केलं आहे. या सर्व घडामोडीत त्यांनी एक ट्वीट केलं असून पुन्हा एकदा एनसीबीला उघडं पाडण्याचा इशारा दिला आहे.
नवाब मलिकांचे आरोप
नवाब मलिक यांनी आपला जावई समीर खान याला एनसीबीनं अडकवल्याचा आरोप केला आहे. “माझा जावई समीर खानला २०० किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तो ड्रग्जचं रॅकेट चालवतो असं सांगण्यात आलं होतं. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचं उघड झालं आहे”, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एसीबीच्या अधिकाऱ्याच्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेली प्रेस रिलीज आणि कारवाईचे फोटो देखील दाखवले. तसेच, समीर वानखेडेंचा फोन नंबर देखील त्यांनी यावेळी दाखवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.