समीर वानखेडेंच्या बदलीवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया; म्हणाले...

सातत्यानं फसवणुकीचा आरोप होत असल्यानं तसेच कार्यकाळ संपल्यानं समीर वानखेडेंची बदली करण्यात आली आहे.
sameer wankhede and nawab malik
sameer wankhede and nawab maliksakal
Updated on

मुंबई : एनसीबीचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बदली त्यांच्या मूळ विभागात म्हणजेच केंद्रीय सीमा शुल्क येथे करण्यात आली आहे. यावर आता मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे. (Nawab Malik reaction to the transfer of Sameer Wankhede)

sameer wankhede and nawab malik
पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर

मलिक म्हणाले, समीर वानखेडे बरेचसे विषय आम्ही जनतेसमोर आणले होते. तसेच बऱ्याच ठिकाणी आम्ही लेखी तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळं त्यांना एक्सटेन्शन मिळालं नाही. त्यामुळं त्यांची मूळ विभागात बदली करण्यात आली आहे. केंद्र सरकरानं हा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे.

sameer wankhede and nawab malik
मुंबई विमानतळावर कोरोना टेस्टचा घोळ; UK स्थित भारतीयाचा आरोप

पण समीर वानखेडे यांना जरी एक्सटेन्शन मिळालं नसलं तरी त्यांनी ज्या चुका, घोटाळे केले आहेत, त्यासंदर्भात विविध ठिकाणी आम्ही दाखल केलेल्या तक्रारींवर सध्या कारवाया सुरु आहेत. जात पडताळणी समितीकडे त्यांच्या बोगस प्रमाणपत्राबाबत तक्रार करण्यात आली असून याची सुनावणी सुरुच आहे. आमच्याकडे यासंदर्भात जे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात सादर करु. त्यानंतर त्यावर जातपडताळणी समितीचा निकाल जरुर येईल. यामध्ये वानखेडे यांनी खोटे दाखले मिळवले हे सिद्ध होईल.

त्याचबरोबर अल्पवयीन असताना समीर वानखेडेंनी सद्गुरु परमिट रुम आणि बारचा परवाना मिळवला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई सुरु आहे. युपीएससीच्या नोकरीत असताना त्यांचं मूळ ठिकाण असलेल्या विभागातून त्यांनी सद्गुरु बारचं परमिट मिळवलं. त्याचबरोबर दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पत्नीची संपत्ती त्यांच्या उद्योग व्यवसायांबाबत त्यांनी माहिती लपवली होती, अशी तक्रारही आम्ही केंद्रीय दक्षता विभागाकडं होती. त्यानंतर या विभागाकडून आमच्याकडे कन्फर्मेशनसाठी पत्र आलं होतं. ही तक्रार तुमचचीच आहे का? याची विचारणा त्यांनी केली. याची पण चौकशी आता सुरु झालेली आहे. तसेच आर्यन खान केसमध्ये मुंबई पोलिसांच्या एसआयटीचा तपास सुरुच आहे, अशी माहितीही यावेळी नवाब मलिक यांनी दिली.

हे जे काही मुद्दे मी उपस्थित केले होते. जिथं जिथं चुका झाल्यात बेकायदेशीर काम झालीत, त्याचा पाठपुरावा मी करणारच आहे. मला विश्वास आहे की याचा पाठपुरावा केल्यानं हे गुन्हे सिद्ध होतील आणि वानखेडेंना शिक्षा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.