NCB ची पुन्हा मोठी कारवाई; मुंबईतून चार कोटींचं हेरॉईन जप्त

मुंबई एनसीबीने ही कारवाई केली आहे.
NCB
NCBsakal media
Updated on

क्रूझ ड्रग प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर एनसीबी अर्थात नार्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरो सध्या चर्चेत आहे. त्यातच आता एनसीबीने पून्हा एकदा राज्यात मोठी कारवाई केली असून, या कारवाईत ४ कोटींचं रुपयांची हेरॉईन सदृष्य व्हाईट पावडर हा अमली पदार्थ जप्त केला आहे. एनसीबीच्या या कारवाईत आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलच्या सहारा कॉम्लेक्स येथून एका पार्सलमधून हे हेरोईन जप्त करण्यात आले आहे.

एनसीबी गेल्या काही दिवासांपासून राज्यात वेगवेळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. दरम्यान, या प्रकरणात एनसीबीने काल एका आरोपीचा वडोदरा येथे जबाब नोंदवला असून, उद्या सीबीआय कार्यालयात त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

NCB
...तर उद्रेक होईल; ST कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीकडून मोठी मोहिम हाती घेण्यात आली असून, त्या अंतर्गत मुंबई गुजरात आणि बाहेरील ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटवर एनसीबीची नजर आहे. यापूर्वी देखील एनसीबीने केलेल्या कारवाईत बॉलीवूडसह वेगवेळ्या क्षेत्रातील काही मोठी नावं समोर आली होती. अशाच काही प्रकरणांचे धागेदोरे शोधण्याचा एनसीबीकडून प्रयत्न सुरू आहे. एनसीबीने ताब्यात घेतलेल्या लोकांचे अन्या काही लोकांशी संबंध आहे का याची पडताळणी एनसीबीकडून सूरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.